शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: मास्क न वापरणाऱ्यांना कोविड सेंटरमध्ये ड्युटी लावा, हायकोर्टाचे सक्त आदेश

By बाळकृष्ण परब | Updated: November 28, 2020 19:26 IST

coronavirus News : जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही तोपर्यंत मास्क हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र अनेकजणांवर सरकारच्या या आवाहनाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही

ठळक मुद्देजे लोक मास्क न लावता फिरतात त्यांच्याकडून दंड वसूल करा दंडात्मक कारवाई करूनही लोक सुधरत नसतील तक त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी पाठवागुजरात उच्च न्यायालयाने सरकारला दिले कठोर आदेश

अहमदाबाद - देशातील कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत असले तरी कोरोनाबाबत सर्वसामान्यांमध्ये असलेले गांभीर्य कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अनेकजण मास्क न लावता फिरत असल्याचे दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर गुजरात हायकोर्टाने आज सक्त आदेश दिले आहेत. जे लोक मास्क न लावता फिरतात त्यांच्याकडून दंड वसूल करा. तसेच दंडात्मक कारवाई करूनही लोक सुधरत नसतील तक त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी पाठवा, असे कठोर आदेश गुजरातउच्च न्यायालयाने सरकारला दिले आहेत.जोपर्यंत कोरोनावरील लस येत नाही तोपर्यंत मास्क हाच बचावाचा एकमेव उपाय असल्याचे सरकारकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. मात्र अनेकजणांवर सरकारच्या या आवाहनाचा काहीही परिणाम होताना दिसत नाही आहे. अनेकजण मास्क न लावता फिरत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे.कोरोनाचा हा वाढचा संसर्ग विचारात घेऊन गुजरात हायकोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. न्यायालयाने सांगितले की, जे लोक मास्कशिवाय फिरताना सापडतील त्यांना कोविड कम्युनिटी सेंटरमध्ये नॉन मेडिकल विभारात १० ते १५ दिवस काम करण्याची जबाबदारी द्या. जर अशा लोकांना कोविड कम्युनिटी सर्व्हिस सेंटरमध्ये सेवा देण्यासाठी पाठवल्यास लोक सतर्क होऊन दिवसभर मास्क लावतील. तसेच राज्य सरकारने कोरोनाच्या परिस्थितीबाबत उत्तर द्यावे, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.गुजरात हायकोर्टात मास्कबाबत एक याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर सुनावणी करताना हायकोर्टाने हे आदेश दिले. या सुनावणीदरम्यान, हायकोर्टाने गुजरात सरकारला राज्यातील कोरोनाच्या संसर्गाबाबत माहिती विचारली. तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे, अशी विचारणाही कोर्टाने केली. त्यावर उत्तर देताना राज्य सरकारने सांगितले की, राज्यात राजकीय कार्यक्रमांवर बंदी आणण्यात आली आहे. विवाहामध्ये केवळ १०० आणि अंत्यसंस्कारांसाठी केवळ ५० जणांना उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHigh Courtउच्च न्यायालयGujaratगुजरात