शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस मोफत देणार, या राज्यातील सरकारने घेतला मोठा निर्णय

By बाळकृष्ण परब | Updated: October 22, 2020 18:44 IST

Corona Vaccine News : कोरोना विषाणूविरोधात विकसित होत असलेल्या लसीमुळे या संकटामधून मार्ग निघण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे.

ठळक मुद्देतामिळनाडूमध्ये लसीकरणाबाबत राज्य सरकारने आज मोठी घोषणा केली आहेतामिळनाडूमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस मोफत दिली जाईलराज्याचे मुख्यमंत्री के. पलानीसामी यांनी केली घोषणा

चेन्नई - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी घालण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळे आर्थिक नुकसानही मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मात्र कोरोना विषाणूविरोधात विकसित होत असलेल्या लसीमुळे या संकटामधून मार्ग निघण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. दरम्यान, कोरोनावरील लस येण्याचे संकेत मिळताच विविध राज्यांमधील सरकारांकडून लसीकरणाबाबतच्या घोषणा होऊ लागल्या आहेत.भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या तामिळनाडूमध्ये लसीकरणाबाबत राज्य सरकारने आज मोठी घोषणा केली आहे. तामिळनाडूमधील प्रत्येक नागरिकाला कोरोनावरील लस मोफत दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीसामी यांनी केली आहे.

आज पुद्दुकोट्टई येथे झालेल्या कार्यक्रमास मुख्यमंत्री पलानीसामी उपस्थित होते. तेव्हा त्यांनी लसीकरणाबाबत घोषणा केली. यावेळी कोरोनाकाळात सरकारने उचललेल्या पावलांबाबत पलानीसामी यांनी माहिती दिली. तसेच कोरोनावरील लस विकसित झाल्यानंतर राज्यातील सर्व नागरिकांना ती मोफत दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.आज भाजपाने बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्यात सत्ता आल्यास कोरोनावरील लस मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर काही वेळातच पलानीसामी यांनी ही घोषणा केली आहे. या जाहीरनाम्यात भाजपाने ११ मोठे संकल्प केले आणि सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. ह्लभाजपा है तो भरोसा हैह्ण ५ सूत्रे, एक लक्ष्य, ११ संकल्प' यासह भाजपाने नवीन नाराही दिला आहे. पाटण्यात जाहीरनामा जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजप नेते भूपेंद्र यादव आणि इतर नेत्यांनी पत्रकार परिषदेत भाषण केले. निर्मला सीतारामन यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मास्क हाच उपाय आहे. परंतु ही लस येताच ती मोठ्या प्रमाणात भारतात तयार होईल. ही लस बिहारच्या लोकांना मोफत दिली जाईल असं आश्वासन भाजपानं दिलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTamilnaduतामिळनाडूHealthआरोग्य