शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

coronavirus: कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांसह कुटुंबातील ८ जणांना कोरोनाचा संसर्ग, मुलगा व्हेंटिलेटरवर

By बाळकृष्ण परब | Updated: October 19, 2020 20:36 IST

coronavirus News : कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल आणि त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच त्यांचे पुत्र डॉ. गोपाल करजोल यांनांही कोरोनाचा संसर्ग झाला असून, ते गेल्या २३ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहेत.

बंगळुरू -गेल्या सात-आठ महिन्यांपासून देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सर्वसामान्यांपासून ते अनेक मोठमोठी नेतेमंडळीही कोरोनाच्या प्रकोपापासून वाचू शकलेले नाही. दरम्यान, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री गोविंद करजोल आणि त्यांच्या कुटुंबातील आठ सदस्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तसेच त्यांचे पुत्र डॉ. गोपाल करजोल यांनांही कोरोनाचा संसर्ग झाला असून, ते गेल्या २३ दिवसांपासून व्हेंटिलेटरवर आहेत. करजोल यांनी ट्विट करून यासंदर्भातील माहिती दिली आहे.करजोल यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले की, माझे पुत्र गोपाल करजोल हे गेल्या २३ दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गामुळे व्हेंटिलेटरवर आहेत. मी कोरोना विषाणूच्या संसर्गातून सावरल्यानंतर हल्लीच माझी पत्नी रुग्णालयातून घरी आली आहे. मी स्वत: १९ दिवसांपर्यंत रुग्णालयात राहिल्यानंतर कोरोनामुक्त झालो आहे. आतापर्यंत माझ्या कुटुंबातील एकूण ८ सदस्य कोरोनाबाधित झाले आहेत.करजोल हे बागलकोट आणि कलबुर्गी जिल्ह्यांचे प्रभारी मंत्री आहेत. तसेच ते बागलकोट जिल्ह्यातील मुढोल मतदारसंघाचे आमदार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. दरम्यान, बागलकोट आणि कलबुर्गी जिल्ह्यांत झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी प्रवास करण्यास आपण अक्षम असल्याचे करजोल यांनी सांगितले.लांब पल्ल्याचा आणि शारीरिकदृष्ट्या थकवणारा प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी मला दिला आहे. त्यामुळे पुरग्रस्त भागाचा दौरा मी टाळत आहे. मात्र असे असले तरी मी जिल्हा प्रशासनच्या सातत्याने संपर्कात आहे. तसेच तेथील परिस्थितीवर नजर ठेवून आहे. २१ ते २६ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान करजोल यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.कर्नाटकमध्ये जून महिन्यापासून कोरोनाचा फैलाव वेगाने वाढला होता. राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. दरम्यान, येडियुरप्पांसह राज्याचे एक उपमुख्यमंत्री डॉ. सी. एस अश्वत्थ नारायण, वनमंत्री आनंद सिंह, सामाजिक कल्याणमंत्री बी. श्रीरामुल, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस सी. टी. रवी, प्राथमिक आमि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार. कृषिमंत्री बी. सी. पाटील, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एस. शिवकुमार यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटक