शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine: भारतीयांना दिले त्यापेक्षा अधिक डाेस परदेशात पाठविले; सरकारची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 07:10 IST

संयुक्त राष्ट्र : ७० हून अधिक देशांना पुरविली लस

संयुक्त राष्ट्र/नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना काेराेना लसींचे जेवढे डाेस दिले त्यापेक्षा अधिक डाेस इतर देशांना पुरविल्याची माहिती भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये दिली आहे. लस पुरवठ्यातील असमानता कोराेना महामारीला राेखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना पराभूत करेल, असा इशाराही भारताने दिला आहे. या असमानतेमुळे गरीब देशांवर सर्वात विपरीत परिणाम हाेतील, असे भारताने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांत भारताच्या राजदूतांचे उपप्रतिनिधी के. नागराज नायडू यांनी भारताच्या भूमिकेबाबत माहिती देताना सांगितले की, लसींच्या आव्हानावर ताेडगा निघाला आहे. आता लसींची उपलब्धता आणि पुरवठ्याचे आव्हान समाेर आहे. जागतिक पातळीवर सहकार्याचा अभाव आणि असमानतेचा गरीब देशांना सर्वाधिक फटका बसणार आहे. अशा स्थितीतही भारत सहा महिन्यांमध्ये ३० काेटी आघाडीच्या काेराेना याेद्ध्यांचे लसीकरण करणार आहे. तसेच या प्रक्रियेदरम्यान ७० हून अधिक देशांना काेराेनाची लस पुरविली आहे. देशातील लसीकरणापेक्षा जास्त डाेस इतर देशांना पुरविल्याचे नायडू यांनी सांगितले. 

लस डिप्लाेमसीवरून टीकासरकारने लसींच्या निर्यातीपेक्षा भारतीय नागरिकांना प्राधान्य देऊन लसीकरण केले असते तर काेराेनाची दुसरी लाट राेखता आली असती, अशी टीका काँग्रेसच्या प्रवक्त्या डाॅ. शामा माेहम्मद यांनी केली आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही या मुद्द्यावरून टीका केली आहे. या मुत्सद्दीपणाची भारताला किंमत माेजावी लागली असून, देशात कराेनाची दुसरी लाट राेखण्यासाठी या डाेसची मदत झाली हाेती, असे अब्दुल्ला म्हणाले. 

‘काेवॅक्स’ केंद्राला दाेन काेटी डाेसभारताकडून ‘गावी’ देशांच्या ‘काेवॅक्स’ केंद्राला लसीचे दाेन काेटी डाेस पुरविण्यात आले आहेत. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता माेहिमांसाठी २ लाख काेराेना लसींचे डाेस पाठविण्यात आले आहेत. भारताच्या या पुढाकाराचे संयुक्त राष्ट्रांकडून आभार मानण्यात आले आहेत. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस