शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

Corona vaccination: नरेंद्र मोदी आणि इतर मंत्री कधी घेणार कोरोनावरील लस, अखेर राजनाथ सिंह यांनी सांगितली वेळ

By बाळकृष्ण परब | Updated: January 16, 2021 21:13 IST

Corona vaccination In India Update : कोरोना लसीबाबत प्रसारित होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे ही लस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारमधील इतर मंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी सोशल मीडिया तसेच काही नेत्यांकडून होत आहे.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनावरील लसीसाठी शास्त्रज्ञांना वेळोवेळी प्रोत्साहित करत आहेतसुरुवातीला कोविड-१९ विरोधातील लढ्यामधील आमच्या फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण पूर्ण होईल५० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. त्यावेळी आम्ही राजकीय क्षेत्रा वावरत असलेले लोकही कोरोनावरील लस घेऊ

नवी दिल्ली - गेल्या वर्षभरापासून कोरोनाच्या संसर्गाचा सामना केल्यानंतर आता भारतात कोरोनाविरोधातील लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान, कोरोनाविरोधातील लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोनावरील लस देण्यात येत आहे. मात्र कोरोना लसीबाबत प्रसारित होत असलेल्या उलटसुलट चर्चांमुळे ही लस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारमधील इतर मंत्र्यांनी घ्यावी अशी मागणी सोशल मीडिया तसेच काही नेत्यांकडून होत आहे. त्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्री कोरोनाची लस कधी घेणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.आज तक या वृत्तवाहिनीली दिलेल्या मुलाखतीत राजनाथ सिंह यांनी याबाबतची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनावरील लसीसाठी शास्त्रज्ञांना वेळोवेळी प्रोत्साहित करत आहेत. आता कोरोनाची लस घेण्याबाबत म्हणाल तर माझ्या माहितीप्रमाणे कोविड-१९ विरोधातील लढ्यामधील आमच्या फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण पूर्ण होईल आणि ५० वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. त्यावेळी आम्ही राजकीय क्षेत्रा वावरत असलेले लोकही कोरोनावरील लस घेऊ, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.यावेळी जनतेच्या मनात विश्वास वाढवण्यासाठी इतर देशातील नेत्यांप्रमाणेच आपल्या देशातही नेत्यांनी लस घेतली पाहिजे होती का, अशा विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह म्हणाले की, इतर देशातील लोकांप्रमाणे आपल्या देशातील जनता विचार करेल असं मला वाटत नाही. कारण कोरोनावरील लसीची अंतिम चाचणी झाली आहे. देशातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांनी ही चाचणी घेतली आहे. मला वाटते की देशातील जनतेचा या लोकांवर विश्वास आहे. तसेच आम्हीही जनतेला विश्वास देत आहोत. दरम्यान, कोविड-१९ च्या आव्हानाचा देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्या प्रकारे केला, त्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.दरम्यान, आज लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरात एक लाख ९१ हजार १८१ जणांना कोरोनाची लस देण्यात आल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. तसेच आतापर्यंत लस दिलेल्यांपैकी कुणावरही दुष्परिणाम दिसून आले नसल्याचेही आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याNarendra Modiनरेंद्र मोदीRajnath Singhराजनाथ सिंहCentral Governmentकेंद्र सरकार