शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccination: १२ ते १४ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारीच्या अखेरपासून सुरुवात होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 07:09 IST

Corona Vaccination: गेल्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर आतापर्यंत ३ कोटींपेक्षा अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला.

नवी दिल्ली : १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस किंवा मार्च महिन्यापासून प्रारंभ होण्याची शक्यता आहे, असे लसीकरणासंदर्भातील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष डॉ. एन. के. अरोरा यांनी सांगितले.ते म्हणाले की, गेल्या ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर आतापर्यंत ३ कोटींपेक्षा अधिक मुलांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. ही मोहीम अतिशय वेगाने राबविली जात आहे. देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील ७.४ कोटी मुले असून त्या सर्वांना या महिन्याच्या अखेरीपर्यंत कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचे लक्ष्य आम्ही ठेवले आहे. डॉ. एन. के. अरोरा म्हणाले, १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचा शाळा, महाविद्यालयांसहित अनेक ठिकाणी संचार असतो. त्यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो. त्यातील १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण प्रथम हाती घेतले आहे. आता १२ ते १४ वर्षे वयाच्या मुलांना लस देण्याबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेईल. सहव्याधीग्रस्त मुलांना प्राधान्याने लस द्या५ ते १४ वर्षे वयोगटातील सहव्याधी असलेल्या मुलांना कोरोनाचा तीव्र स्वरूपाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे अशा मुलांना केंद्र सरकारने प्राधान्याने कोरोना लस द्यावी, असे मत काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले.१५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना सध्या भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन लस देण्यात येते. १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी आपत्कालीनसाठी केंद्र सरकारने कोव्हॅक्सिनला मान्यता दिली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस