शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
3
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
4
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
5
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
6
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...
7
रस्ते, मेट्रो, सिंचन, कुंभमेळा...सरकारने सादर केल्या 57 हजार 509 कोटींच्या पुरवणी मागण्या
8
'ChatGPT' ला हे प्रश्न विचारू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता
9
प्रेमात मिळाला धोका तेव्हा खासगी आयुष्यातील 'तो' व्हिडिओ केला लीक; क्रिकेटर अडकला होता वादात
10
अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी
11
सौरभ गोखले आणि अनुजा साठेला नकोय मूल, अभिनेत्री म्हणाली- "आम्हाला प्राणी जास्त आवडतात..."
12
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
13
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
14
श्वेता तिवारीला एक्स पतीने कारमध्ये एका व्यक्तीसोबत पकडलं होतं रंगेहाथ, राजा चौधरीचा खुलासा
15
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
16
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
17
शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)
18
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविच विक्रमी २५ वे ग्रँडस्लॅम जिंकण्याचा डाव साधणार का?
20
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर

अलिगड मुस्लिम विद्यापीठातील भाजपाच्या कार्यक्रमामुळे वादंग

By admin | Updated: November 28, 2014 23:54 IST

भाजपाने 1 डिसेंबर रोजी स्वातंत्र्यसेनानी राजा महेंद्र प्रताप यांचा जयंती कार्यक्रम अलिगड मुस्लिम विद्यापीठात आयोजित केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली/ अलिगड :  भाजपाने 1 डिसेंबर रोजी स्वातंत्र्यसेनानी राजा महेंद्र प्रताप यांचा जयंती कार्यक्रम अलिगड मुस्लिम विद्यापीठात आयोजित केल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या वादात राजकीय पक्षांनी उडी घेतली असतानाच या विद्यापीठातील शेकडो विद्याथ्र्यानी मोर्चा काढत भाजपाच्या प्रस्तावित कार्यक्रमाला विरोध केल्याने वातावरण तापले आहे. भाजपाचे नेते समाजाचे ध्रुवीकरण करीत असून, राजा महेंद्र प्रताप यांच्या नावाचा गैरवापर करीत या विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर आक्रमण करीत असल्याचा आरोप विद्यापीठातील शिक्षक संघटनेने (एएमयुटीए) केला आहे.
 बसपा, समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षांनी या कार्यक्रमाला विरोध करीत तीव्र चिंता व्यक्त केली आहे. भाजपेतर पक्षांनी सोमवारी या विद्यापीठाच्या परिसरात निदर्शनांद्वारे निषेध नोंदविण्याचे ठरविले आहे. कुलगुरू लेफ्ट.जन. झमीर उद्दीन शाह यांनी विद्यापीठात ध्रुवीकरण होण्याची भीती व्यक्त करतानाच अशांतता निर्माण होण्याचा इशारा मानव संसाधन विकास मंत्री स्मृती इराणी यांना पाठविलेल्या पत्रत दिला आहे. राजकीय यंत्रणोवर नियंत्रण न राहिल्यास जातीय संघर्ष उद्भवण्याची शक्यताही शाह यांनी वर्तवली. कोणतेही पत्र नाही- स्मृती इराणी
या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाकडून कार्यक्रमाला विरोध करणारे कोणतेही पत्र मिळाले नसल्याचा खुलासा स्मृती इराणी यांनी केला आहे. 
(लोकमत न्यूज नेटवर्क)