शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्युमेंट्रीमधील गुजरात, गाय शब्दांवर सेन्सॉर बोर्डाने घेतला आक्षेप

By admin | Updated: July 12, 2017 15:26 IST

प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांच्यावर बनवण्यात आलेल्या माहितीपटाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले आहेत.

 ऑनलाइन लोकमत 

कोलकाता, दि. 12 - प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांच्यावर बनवण्यात आलेल्या माहितीपटाच्या प्रदर्शनात अडथळे निर्माण झाले आहेत. सेन्सॉर बोर्डाने डॉक्युमेंट्रीचे निर्माते सुमन घोष यांना डॉक्युमेंट्रीमधील गुजरात, गाय, हिंदुत्व आणि हिंदू इंडिया हे शब्द म्युट करण्याची सूचना केली आहे. पण सुमन घोष यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांचे पालन करण्यास नकार दिला आहे. 
 
आपण एकही  शब्द म्युट करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे तूर्तास तरी ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित होऊ शकणार नाही. "द टेलिग्राफ"ने हे वृत्त दिले आहे. घोष यांनी मंगळवारी सीबीएफसीच्या कार्यालयात "द आरग्युमेंटीव्ह इंडियन" ही डॉक्युमेंट्री दाखवली त्यावेळी त्यांना गुजरात, गाय, हिंदू हे शब्द म्युट करुन यूए प्रमाणपत्र घ्या, तरच चित्रपट प्रदर्शित करता येईल असे सांगण्यात आले. 
 
लोकशाही देशामध्ये सरकारवर केलेल्या टीकेची अशा प्रकारे तपासणी होणे धक्कादायक आहे. डॉक्युमेंट्रीमधील काही शब्द बीप किंवा म्युट करण्याची मागणी मी अजिबात मान्य करणार नाही असे सुमन घोष यांनी सांगितले. 2002 आणि 2017 अशा दोन भागात  "द आरग्युमेंटीव्ह इंडियन" ही डॉक्युमेंट्री चित्रीत करण्यात आली आहे. कॉर्नेल विद्यापीठामध्ये व्याख्यान देताना सेन यांनी गुजरातचा उल्लेख केला होता. 
 
आणखी वाचा 
मिशा नसताना मी भ्रष्टाचार कसा केला? तेजस्वी यादवांचा मोदी सरकारला प्रश्न
अमरनाथ दहशतवादी हल्ल्यामुळे दु:खी - शाहरुख खान
मोदी कोणत्याही गोष्टीला अशक्य मानत नाहीत - मोहन भागवत
 
 
प्रसारमाध्यमांशी बोलताना घोष यांनी सेन्सॉर बोर्डाच्या सूचनांवर जोरदार टीका केली आहे. डॉक्युमेंट्रीमध्ये सेन गुजरात दंगलीसंबंधी बोलत आहेत त्यातील गुजरात शब्द मला म्युट करायला सांगितलाय. त्यानंतर गाय शब्द म्युट करण्याची सूचना आहे. माझ्या दृष्टीने अशा सूचना म्हणजे विनोद आहे. हिंदू, हिंदुत्व हे शब्द सुद्धा म्युट करायला सांगितले त्यावर माझा तीव्र आक्षेप आहे. सेन्सॉर बोर्डाच्या आदेशामुळे उडता पंजाब, लिपस्टिक अंडर माय बुरखा हे चित्रपट वादग्रस्त ठरले. चित्रपटांचा नियम डॉक्युमेंट्रीला लावला जाईल असे मला वाटले नव्हते असे सुमन घोष यांनी सांगितले. येत्या शुक्रवारी कोलकातामध्ये हा माहितीपट प्रदर्शित होणार होता.
 
अमर्त्य सेन यांच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधक म्हणून पाहिले जाते. 2014 लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना त्यांनी मोदींवर टीका केली होती. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना आपल्याला देशाचे पंतप्रधान म्हणून पहायला आवडणार नाही असे वक्तव्य करुन त्यांनी मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला तेव्हा विरोध केला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदीच्या निर्णयावरही त्यांनी आसूड ओढले होते. नोटाबंदी म्हणजे मोठी चूक असल्याचे त्यांनी म्हटले होते.