शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मानसिक तणावावर नियंत्रण ठेवा, समजून घ्या ‘कोरोना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 03:58 IST

सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठलेही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना विषाणूबाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की या आजाराची बाधा व लक्षणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

गेल्या दोन दिवसात कोरोना विषाणूमुळे २ आत्महत्या झाल्या. यातील एक बाधित व्यक्तीची होती तर दुसरी कुठलीही कोरोना विषाणूची लक्षणे नसलेली व्यक्ती होती. अशी टोकाची कृती काही विचार प्रक्रियेमुळे अमलात आणली जाते. काही लक्षणे नसताना आता आपले व जगाचे काय होणार, ही मनात दाटून आलेली भीती व निराशा यामागे असून शकते. लक्षणे नसताना मृत्यूची भीती वाटणे व कोरोना विषाणूने मृत्यू होण्यापेक्षा आपणच स्वत:ला संपवण्याची निराशेपोटी इच्छा दाटून येणे, यासोबत आधीपासून असलेले नैराश्य, घरात पूर्वी कोणी आत्महत्या केली असल्यास व आधी त्या व्यक्तीनेच आत्महत्येचा अयशस्वी प्रयत्न केला असल्यास जोखीम जास्त असते.

सगळ्यात आधी असे नैराश्येचे कुठलेही विचार मनात येत असल्यास मानसोपचारतज्ञांचा त्वरित सल्ला घ्या. कोरोना विषाणूबाधित व्यक्तीने हे लक्षात घ्यावे की या आजाराची बाधा व लक्षणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ‘कोविड-१९’ची लागण झाल्यावर ८५ टक्के शक्यता आहे की, तुम्हाला अगदी सौम्य व थोडी फार लक्षणे येतील. तसेच उर्वरित १५ टक्क्यांमध्ये बहुतांश लोक बरे होत आहेत. तसेच आपली मानसिकता व प्रतिकारशक्तीचा थेट संबंध असतो. याला ‘सायको न्युरो - इम्युनो अ‍ॅक्सीस’ असे म्हणतात. हा कमकुवत झाला तर ‘कोविड-१९’च नव्हे तर कुठल्याही आजाराविरोधात लढण्यास शरीर सक्षमता गमावून बसते. म्हणून या विषाणूची बाधा झाली तरी खचून न जाणे हा उपचाराचाच भाग आहे, असे समजावे. हे कळते पण वळत नाही, अशी स्थिती असते. यासाठी पहिली पायरी आहे, आपल्याला जे वाटते आहे ते आपल्या जवळच्या नातेवाईकांना मनमोकळेपणाने बोलून दाखवणे. अशा वेळी नातेवाईकांची भूमिका महत्वाची ठरते. रुग्णाला आयसोलेट करायचे म्हणजे त्याच्याशी तुम्ही संवाद ठेवू शकता. त्याच्याशी फोन वर बोलत राहू शकता. गरज वाटल्यास लगेचच समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ञांची मदत घेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घ्यायला हवा.- डॉ. अमोल अन्नदाते,(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या