शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमध्ये आणखी मोठी कपात अपेक्षित, ग्राहक, व्यापा-यांना मिळणार दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 06:32 IST

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी १७८ वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचा दर २८ वरून १८ टक्क्यांवर आणल्यानंतर आता याच कक्षेतील आणखी वस्तू व सेवांची संख्या कमी करण्यात येणार आहे.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी १७८ वस्तू आणि सेवांवरील जीएसटीचा दर २८ वरून १८ टक्क्यांवर आणल्यानंतर आता याच कक्षेतील आणखी वस्तू व सेवांची संख्या कमी करण्यात येणार आहे. सरकार याबद्दल गांभीर्याने विचार करीत आहे. त्यामुळे व्यावसायिक व ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.सूत्रांनी सांगितले की, नोव्हेंबरमध्ये जीएसटी वसुलीचा आकडा १ लाख कोटींच्या पुढे जाईल, असा सरकारला विश्वास आहे. त्यामुळे लोकांच्या वापरातील आणखी काही महत्त्वाच्या वस्तूंवरील दरकपातीवर विचार केला जात आहे. याशिवाय १८ टक्के कर असलेल्या काही वस्तूंना १२ टक्के कराच्या कक्षेत आणण्यात येणार आहे. यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी आणखी १० दिवसांचा अवधी लागेल, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी सांगितले की, सध्या २८ टक्के करकक्षेत ५० वस्तू आहेत. त्यातील अर्ध्या वस्तूंना १८ टक्क्यांच्या कक्षेत आणण्यावर सरकार विचार करीत आहे. आता जीएसटी व्यवस्था स्थिरस्थावर झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकांच्या चेहºयावर हसू हवे आहे.>कोणत्या वस्तूंवरील दर कमी होण्याची शक्यता?सिमेंट, पेंट आणि वॉर्निश उद्योगावरील कर २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला जाऊ शकतो. बांधकाम विभागालाही दरकपातीची आशा आहे. जीएसटीच्या आधी सिमेंट उद्योगावर १२%व्हॅट, १४ टक्के उत्पादन शुल्क आणि २ टक्के उपकर होता.एअर कंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स, रेफ्रिजरेटर्स, फ्रिजर्स, डिश वॉशरर्स, शेव्हर्स, हेअर क्लिपर्स, डिजिटल कॅमेरे, मोटारसायकली आणि मोपेड यांच्यावरील करही कमी करण्याची मागणी होत आहे. या वस्तू लक्झरी प्रवर्गात मोडत नाहीत. तंबाखू, एअरटेडेड वॉटर्स, लॉटरी, पिस्तुले, यॉट, खासगी विमाने, महागड्या कार एवढ्याच वस्तूंवर २८ टक्के कर असावा, अशी मागणी होत आहे.>खाद्यपदार्थांचे दर कमी न झाल्यामुळे वित्तमंत्री नाराजजीएसटीअंतर्गत महसूल वसुली स्थिर झाल्यानंतर यादीत कपात व्हायला हवी, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यापूर्वीच म्हटले होते. रेस्टॉरंटवरील कर कमी होऊनही खाद्यपदार्थांचे दर कमी न झाल्यामुळे वित्तमंत्री नाराज आहेत.> लोकांना खूश करण्यास...नोव्हेंबरमधील करवसुलीचे अधिकृत आकडे जाहीर झाले नसले तरी वसुलीत मोठी वाढ झाल्याचे संकेत आहेत. त्यावरून सरकार सार्वजनिक वापरातील वस्तूंवरील कर कमी करण्यावर विचार करीत आहे. दरकपात होणारच आहे. फक्त ती पुढील जीएसटी बैठकीत द्यायची की, १ फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात, एवढाच काय तो प्रश्न आहे. गुजरात निवडणुकीपूर्वी लोकांना खूश करावे, असे सरकारला वाटले तर डिसेंबरच्या प्रारंभीच जीएसटी परिषदेची बैठक घेऊन दरकपात होऊ शकेल.

टॅग्स :GSTजीएसटीGovernmentसरकार