शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत राममंदिराची उभारणी डिसेंबरपासून

By admin | Updated: January 8, 2016 03:19 IST

अयोध्येतल्या राम मंदिराचे बांधकाम उशिरात उशिरा २0१६ च्या अखेरच्या महिन्यात सुरू होईल. मंदिर उभारणीसाठी कोणतेही आंदोलन केले जाणार नाही

नवी दिल्ली : अयोध्येतल्या राम मंदिराचे बांधकाम उशिरात उशिरा २0१६ च्या अखेरच्या महिन्यात सुरू होईल. मंदिर उभारणीसाठी कोणतेही आंदोलन केले जाणार नाही तर सर्वसहमतीनेच या मंदिराची निर्मिती केली जाईल. सुप्रीम कोर्टात सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणाचा निकाल बहुधा आॅगस्ट अथवा सप्टेंबर महिन्यात लागेल. निकालाची आम्ही प्रतीक्षा करू, त्याचबरोबर हिंदू आणि मुस्लिम समुदायाच्या सहमतीनेच वर्षअखेर मंदिराच्या बांधकामाला प्रारंभ होईल, असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्लीतील विश्व हिंदू परिषदेच्या स्थानिक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना काढले.हिंदू व मुस्लिम समुदाय या विषयावर सहमत होतील याची खात्री आपणास कशामुळे वाटते? असे विचारता स्वामी म्हणाले, या विषयावर सौहार्दपूर्ण वातावरणात दोन्ही समुदायांमधे चर्चा व्हावी व त्यातून सहमतीचा तोडगा निघावा यासाठी कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. दिल्ली विद्यापीठात त्यासाठी दोन दिवसांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ३00 विद्वान, पुरातत्व विभागाचे जाणकार, इतिहासतज्ज्ञ व शिक्षण क्षेत्रातल्या मान्यवरांना त्यात निमंत्रित करण्यात आले आहे.९ जानेवारीला मंदिर निर्माणाचा अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर केला जाईल, असा गौप्यस्फोटही याप्रसंगी स्वामींनी केला.उत्तरप्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक आहे. त्या पार्श्वभूमीवर ही मोहीम आखण्यात आली आहे काय? या थेट प्रश्नाचे उत्तर देतांना स्वामी म्हणाले, प्रभू श्रीरामाचे अयोध्येतील मंदिर हा हिंदूसाठी आस्था, प्रेरणा आणि विश्वासाचा विषय आहे. देशातला प्रत्येक हिंदू त्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचा संबंध कोणत्याही निवडणुकीशी जोडणे योग्य नाही.लखनौत एका कार्यक्रमात भाजप खासदार साक्षी महाराज म्हणाले, जगातील कोणतीही शक्ती अयोध्येतील राम मंदिराचे निर्माण रोखू शकणार नाही. सारांश राममंदिराच्या जुन्या विषयाने पुन्हा एकदा डोके वर काढले असून उत्तरप्रदेशची निवडणूक जसजशी जवळ येईल, या विषयाच्या संघर्षाची धारही वाढत जाण्याची शक्यता आहे. (विशेष प्रतिनिधी)