शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या मित्रपक्षांमध्ये वाद, NDA सरकारमध्ये वाढली डोकेदुखी; बंद दाराआड बैठक घेणार
2
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
3
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
4
अमूल, पार्ले-जी, गोदरेज... अमेरिकेच्या टॅक्सपासून वाचण्यासाठी भारतीय कंपन्यांचा 'जुगाड', उचलू शकतात 'हे' पाऊल
5
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
6
बलात्काराची खोटी तक्रार; माजी महिला बँक कर्मचाऱ्याला अटक
7
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
8
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
9
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
10
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
11
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
12
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
13
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
14
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
15
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
16
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
17
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
19
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
20
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्याने स्मृती इराणींवर फेकल्या बांगड्या, मंत्री म्हणाल्या हा काँग्रेसचा डावपेच

By admin | Updated: June 13, 2017 11:08 IST

महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमधील शेतकरी अंदोलनाचा वनवा आता गुजरातमध्ये पसरल्याचे दिसतं आहे. काल केंद्रिय मंत्री स्मृती इराणी एका कार्यक्रमासाठी गुजरातला गेल्या असता

ऑनलाइन लोकमतअहमदाबाद, दि. 13 - महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि राज्यस्थानमधील शेतकरी अंदोलनाचा वनवा आता गुजरातमध्ये पसरल्याचे दिसतं आहे. काल केंद्रिय मंत्री स्मृती इराणी एका कार्यक्रमासाठी गुजरातला गेल्या असता त्यांच्या दिशेनं एका शेतकऱ्याने बांगड्या फेकल्याची घटना घडली आहे. गुजरातमधील अमरेली येथे स्मृती इराणी यांची काल जाहीर सभा होती. त्या व्यसपीठावर भाषण करत असताना एका शेतकऱ्याने त्यांच्या दिशेने बांगड्या फेकल्या. केतन कासवाल असे त्या तरूण शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर पोलिसांनी त्याला लगेचच ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कासवाल याला घेऊन जात असताना स्मृती इराणी यांनी त्याला सोडून द्यायची विनंती केली होती. त्याला बांगड्या फेकू देत. मी याच बांगड्या त्याच्या बायकोला भेट देईन, असे इराणी यांनी म्हटले. गुजरात मध्ये निवडणुकीचे वारे वाहत असून आशा घटना घडू शकतात याचा मला अंदाज यापूर्वीच होता. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका करताना म्हटले की, एका महिलेवर आक्रमण करण्यासाठी त्यांनी पुराषाला पाठवलं आहे. काँग्रेसची ही रणनीती चुकीची आहे. या घटनेविषयी स्थानिक काँग्रेस नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, केतन कासवाल शेतकरी असून त्याने कर्जमाफीच्या मागणीसाठी बांगड्या फेकून सरकारचा निषेध केला. कासवालचा काँग्रेस पक्षाशी कोणताही संबंध नाही. बांगड्या फेकताना तो केवळ वंदे मातरमच्या घोषणा देत होता.मोदी सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्मृती इराणी बोलत होत्या. यावेळी केतन कासवाल हा व्यासपीठापासून बऱ्याच दूर अंतरावर बसला होता. इराणी यांनी भाषणाला सुरूवात केल्यानंतर केतन अचानकपणे उठला. यावेळी त्याने इराणी यांच्या दिशेने दोन ते तीन बांगड्या फेकल्या. मात्र, केतन व्यासपीठापासून दूर असल्याने त्या इराणी यांच्यापर्यंत पोहचू शकल्या नाहीत.

आणखी वाचा -   स्मृती इराणी यांना मोदी यांचा आणखी एक हादरा

कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम हैं कहना - स्मृती इराणी

 

राहुल गांधी काँग्रेसचे अध्यक्ष झाले तर, भाजपसाठी "अच्छे दिन" - स्मृती इराणी