शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अन्याय करणाऱ्या सपाच्या मांडीवर काँग्रेस - मोदींची टीका

By admin | Updated: February 12, 2017 14:10 IST

मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीसोबत केलेल्या आघाडीवरून पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केले आहे. राजकीय स्वार्थापायी काँग्रेज आज अन्यायी समाजवादी पक्षाच्या

ऑनलाइन लोकमत
देहराडून, दि, 12 - माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या रेनकोट टिप्पणीवरून सुरू झालेला वाद अद्यापही थांबलेला नाही. मात्र मोदींनी उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीसोबत केलेल्या आघाडीवरून पुन्हा एकदा काँग्रेसला लक्ष्य केले आहे. राजकीय स्वार्थापायी काँग्रेज आज अन्यायी समाजवादी पक्षाच्या मांडीवर जाऊन बसली आहे, अशा शेलक्या शब्दात आज उत्तराखंडमधील श्रीनगर येथे प्रचारसभेला संबोधित करताना मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. 
मोदी म्हणाले, उत्तराखंड आंदोलनावेळी समाजवादी पक्षाच्या लोकांनी  आंदोलकांवर अन्याय अत्याचार केले होते. त्याच समाजवादी पक्षाच्या मांडीवर आज काँग्रेस जाऊन बसली आहे. यावेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यावरही मोदींनी हल्लाबोल केला. ज्या व्यक्तीला राज्याविषयी आपलेपणा वाटत नाही तो राज्याचे काय भले करणार? असा सवाल मोदींनी केला. तसेच उत्तराखंडच्या विकासासाठी काँग्रेसला राज्यातून हटवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 
यावेळी भ्रष्टाचार, नोटबंदी, वन रँक वन पेन्शन आणि सर्जिकल स्ट्राइकवरूनही मोदींनी काँग्रेसवर निशाणा साधला. "काँग्रेसने सर्जिकल स्ट्रइकचे पुरावे मागितले होते, हा सैनिकांचा अवमान होता. आता काळ बदलला आ्हे. दिल्लीतील सरकारही बदलले आहे. आता माझ्या देशाचा जवान वार झेलणार नाही तो पलटवार करेल," असे मोदी म्हणाले.