नवी दिल्ली : आर्थिक सुधारणांसाठी महत्त्वपूर्ण असलेले जीएसटी विधेयक मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली हे काँग्रेस नेत्यांचे मन वळविणार आहेत. सरकारशी संबंधित उच्चस्तरीय सूत्रांनी ही माहिती दिली. जीएसटी विधेयकास लोकसभेने मंजुरी दिली आहे. तथापि, राज्यसभेत सरकारकडे बहुमत नसल्यामुळे हे विधेयक अडकले आहे. काँग्रेसचा पाठिंबा त्यासाठी आवश्यक आहे.
‘जीएसटी’साठी जेटली वळविणार काँग्रेसचे मन
By admin | Updated: July 6, 2016 01:39 IST