शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस आज नव्या लढ्याचा बिगुल फुंकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2015 22:07 IST

केंद्रातील मोदी सरकारने भूसंपादनावर पुन्हा अध्यादेश काढला नसला तरी आता मागच्या दाराने राज्य सरकारांची मदत घेऊन तोच कायदा पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीकेंद्रातील मोदी सरकारने भूसंपादनावर पुन्हा अध्यादेश काढला नसला तरी आता मागच्या दाराने राज्य सरकारांची मदत घेऊन तोच कायदा पुन्हा आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसतर्फे मोदी सरकारचा हाच डाव उधळून लावण्याकरिता आज रविवारी दिल्लीच्या रामलीला मैदानावर देशातील शेतकऱ्यांना एकजूट केले जाणार आहे. सरकारच्या भूसंपादन दुरुस्ती विधेयकाच्या विरोधातही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी याच मैदानावरुन आंदोलन छेडले होते. इतर पक्षांच्या मदतीने या मुद्यावरून सरकारवर दबाव आणण्यात काँग्रेस यशस्वी ठरली असून त्याच प्रयोगाची पुनरावृत्ती करण्याची या पक्षाची मनिषा आहे. या किसान सन्मान रॅलीत राहुल गांधी नव्या संघर्षाची घोषणा करणार असून काँग्रेसच्या राजकारणातील ही नवी खेळी असणार आहे. या संपूर्ण संघर्षाचे श्रेय राहुल यांना दिले जाणार आहे. तसेच या माध्यमाने आपली शेतकरी व्होटबँक बळकट करण्याची या पक्षाची योजना आहे. आपला पारंपरिक मतदार गमावलेल्या काँग्रेसने राजकारणात पुन्हा वर्चस्व स्थापित करण्यासाठी शेतमजुरांवर लक्ष केंद्रित केले आहे. राहुल गांधी यांनी अज्ञातवासातून परत आल्यापासून आजपर्यत केलेले दौरे याचे साक्षीदार आहेत. राहुल हे या काळात शेतकऱ्यांमध्येच राहिले. काँग्रेसच्या पाठिशी उभे राहणारे शेतकऱ्यांचे हे बळ किसान सन्मान रॅलीत बघायला मिळेल,अशी अपेक्षा आहे.केंद्र सरकारला जमिनी हिसकावू देणार नाही- काँग्रेसचे दिग्गज नेते ए.के. अ‍ॅन्टनी, मोतीलाल वोरा, भूपेंद्र हुड्डा आणि आर.एस. सुरजेवाला यांनी तर शनिवारपासूनच मोदी सरकारविरुद्ध मोर्चा उघडला. शेती उत्पादन समर्थन मूल्यांचे आकडे सादर करून मोदी सरकार खोटारडे आणि शेतकरी विरोधी असल्याचे त्यांनी सिद्ध केले. - एक डाव पराभूत झाल्यानंतर आता राज्य सरकारांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्याची केंद्राची इच्छा असून सरकारला असे करण्यापासून रोखावे लागेल, असे या नेत्यांनी स्पष्ट केले. - शेतकऱ्यांनी पहिला संघर्ष जिंकला असून आता दुसरी लढाई लढायची आहे आणि शेतकऱ्यांच्या दिल्ली रॅलीने नवा लढा सुरू होणार आहे. यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि दिल्लीतून सर्वाधिक गर्दी होणार आहे. इतर राज्यांमधील शेतकऱ्यांनाही रॅलीत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे.