शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
2
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
3
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
4
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
5
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
6
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
7
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
8
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
9
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
10
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
11
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
12
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ठेवलेल्या नैवेद्याला कावळा शिवत नाही? नक्कीच हातून घडत असणार 'या' ५ चुका!
14
₹२ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; ४३ दिवसांपासून सातत्यानं अपर सर्किट, तुमच्याकडे आहे?
15
"ती स्वभावाने खूप शांत आहे..."; अजित पवारांमुळे चर्चेत आलेल्या IPS अंजना कृष्णाचे वडील काय म्हणाले?
16
जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचा जर्मन कंपनीसोबत नवीन व्यवसाय, ६ महिन्यांत शेअरने दिला ४२% परतावा
17
मीच माझ्या रुपाची राणी ग! सेल्फी पाहून लोकांनी उडवली खिल्ली पण 'तिने' डिलीट केला नाही फोटो
18
RBI Recruitment: रिझर्व्ह बँकेत ऑफिसर पदांसाठी भरती, १ लाख पगार! कोण करू शकतं अर्ज?
19
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
20
एसीच्या स्फोटाने दिल्ली हादरली; पिझ्झा आउटलेटमध्ये जोरदार स्फोट!

वाराणशीत काँग्रेस करणार मोदींविरोधी शक्तिप्रदर्शन

By admin | Updated: May 7, 2014 08:58 IST

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना थेट प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ९ मे रोजी वाराणशीत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत.

९ मे रोजी सभा : राहुल गांधी करणार हल्लाबोल

शीलेश शर्मा, नवी दिल्ली

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना थेट प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ९ मे रोजी वाराणशीत जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहेत. मोदींनी अमेठीत राहुल गांधींना लक्ष्य बनविल्याने त्यांना थेट टक्कर देण्याचा निर्णय राहुल आणि प्रियंका गांधी यांनी घेतला आहे. मोदींनी अमेठीत गांधी कुटुंबावर वैयक्तिक टीका केल्यानंतर काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. मोदी आता खूप समोर गेले असून आता वाक्युद्ध थांबवत संघर्षविराम केला जावा यासाठी काँग्रेसच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र राहुल आणि प्रियंका आपल्यावर निर्णयावर ठाम असल्याचे या पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी ९ मे रोजी वाराणशीत दाखल होतील. ते रोड शो करणार की प्रचारसभा घेणार ते अद्याप स्पष्ट झाले नाही. मोदींच्याविरोधात मोठे शक्तिप्रदर्शन केले जाणार असून काँग्रेसला अमेठीतील मोदींच्या प्रचारसभेचे रोखठोक प्रत्युत्तर कसे द्यायचे ते आम्हाला माहीत आहे, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. सोनिया गांधी, प्रियंकांच्या हजेरीची आशा... राहुल गांधी यांच्यासह सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा यांच्या वाराणशी दौर्‍याबाबत काँग्रेसमध्ये चर्चा सुरू असली तरी अद्याप तसे स्पष्ट संकेत मिळाले नाहीत मात्र अखेरच्या टप्प्यात त्या प्रचार करू शकतात. प्रियंकांनी होकार दिल्यास त्या ९ मे रोजी राहुल गांधी यांच्यासोबत किंवा १० मे रोजी स्वतंत्ररीत्या वाराणशीत प्रचार करू शकतात. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे अजय राय यांच्या प्रचाराचे सूत्रसंचालन करीत आहेत. आनंद शर्मा, मोहन प्रकाश, मधुसुदन मिस्त्री, प्रमोद तिवारी यांच्यासह अनेक दिग्गज नेते ८ मे रोजी वाराणशीत दाखल होतील. काही मुस्लीम नेत्यांना आधीच तेथे रवाना करण्यात आले आहे. बुद्धिजीवींच्या एका गटाला तेथे डेरेदाखल होण्याचा सल्ला देण्यात आला आहे.