शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

काँग्रेसकडून कामत यांचे मन वळविण्याचे प्रयत्न

By admin | Updated: June 9, 2016 06:12 IST

माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत राजकीय संन्यास मागे घेणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले आहे.

शीलेश शर्मा

नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत राजकीय संन्यास मागे घेणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले आहे. कामत हे महत्त्वपूर्ण सहकारी असून पक्षासाठी काम करत राहतील. त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लवकरच मार्ग शोधला जाणार असून अडचणी दूर केल्या जातील, असे काँग्रेसचे प्रवक्ते अजयकुमार यांनी बुधवारी स्पष्ट केले.कामत यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केल्यानंतरही त्यांच्याकडील राजस्थान, गुजरातसारख्या महत्त्वपूर्ण राज्यांचा प्रभार कायम ठेवण्यात आला आहे. ज्येष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी कायम संपर्क चालविला असून पक्षनेतृत्वाने तूर्तास त्यांच्या कामकाजात फेरबदल करण्याचा हेतू स्पष्ट केलेला नाही.मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या प्रभावावर अंकुश लावला जाऊ शकतो. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल पक्षनेतृत्वाकडे अनेकदा तक्रारी करूनही तोडगा निघू शकलेला नव्हता. त्यामुळेच कामत यांनी राजकीय संन्यासाचे पाऊल उचलल्याचे मानले जाते.लवकरच राहुल गांधींसोबत चर्चा....कामतांनी राजकीय संन्यासाची घोषणा करताच हादरलेल्या काँग्रेसने प्रभारी सरचिटणीस मोहन प्रकाश यांना तत्काळ संकट दूर करण्याच्या कामी लावले मात्र कोणतीही ठोस निष्पत्ती न निघाल्याने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या काही खास निकटस्थांकडे ही जबाबदारी सोपविल्याचे सूत्रांनी सांगितले. लवकरच राहुल गांधी कामत यांच्याशी चर्चा करू शकतात. कामत यांनी राजी केले जाऊ शकते. राज्यसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडे अतिरिक्त जबाबदारीही सोपविली जाऊ शकते. मुंबई प्रदेश काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदल घडवून आणले जाऊ शकतात, अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे.काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोर्चे काढू नयेत आणि आंदोलने करू नयेत, असे आवाहन गुरुदास कामत यांनी बुधवारी आपल्या समर्थकांना केले. (प्रतिनिधी)>कामत यांच्या घरवापसीसाठी आंदोलन गुरुदास कामत यांनी राजकारणातून निवृत्तीचा निर्णय बदलावा आणि पक्षकार्यात सक्रीय व्हावे, या मागणीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी आझाद मैदान येथील पक्ष कार्यालयाबाहेर जोरदार शक्तीप्रदर्शन करत आंदोलन केले. यावेळी कामत गटातील नेत्यांसोबतच निरुपम यांच्या कार्यशैलीमुळे दुखावलेल्या नेत्यांनी हजेरी लावली. आमदार नसीम खान, जनार्दन चांदूरकर यांच्यासह माजी आमदार कृपाशंकर सिंह, राजहंस सिंह, मधू चव्हाण, कृष्णा हेगडे, अशोक जाधव, बलदेव खोसा आदी नेत्यांनी यावेळी आंदोलकांना संबोधित केले.