शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
3
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
4
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
5
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
6
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
7
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
8
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
9
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
10
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
11
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
12
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
13
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
14
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
15
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
16
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
17
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
18
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
19
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
20
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी

काँग्रेसने कर्नाटकच्या १४ आमदारांना मुंबईत हलविले

By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST

कर्नाटकात ११ जून रोजी राज्यसभेच्या ४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ५ उमेदवार आहेत.

सुरेश भटेवरा,

नवी दिल्ली- कर्नाटकात ११ जून रोजी होणारी राज्यसभा निवडणूक पुढे ढकलू नये, निवडणूक टाळल्यास अथवा पुढे ढकलल्यास घोडेबाजाराला उघड उत्तेजन मिळेल, अशी तक्रार घेऊन दिग्विजयसिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेतली. भाजपा व जनता दल (सेक्युलर)ने ही निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. कर्नाटकात ११ जून रोजी राज्यसभेच्या ४ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत ५ उमेदवार आहेत. काँग्रेसने जयराम रमेश, आॅस्कर फर्नांडिस आणि के. सी. राममूर्ती, तर भाजपने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन आणि जद (से) ने बी. एम. फारूक यांना उमेदवारी दिली आहे. विजयासाठी प्रत्येक उमेदवाराला ४५ मते हवीत. विधानसभाध्यक्ष वगळता काँग्रेसकडे १२२ मते आहेत. याचा अर्थ काँग्रेसच्या तिसऱ्या उमेदवाराला विजयासाठी पक्षाची ३२ अधिकृत मते मिळाल्यावर आणखी १३ मतांची आवश्यकता आहे. त्यासाठी १ अपक्ष व जद (से) च्या ५ आमदारांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याची माहिती हाती आहे.कर्नाटकात राज्यसभा निवडणुकीत धनशक्तीचा वापर कसा होतो आहे, या संबंधी एका वृत्तवाहिनीने नुकतेच एक स्टिंग आॅपरेशन प्रसारित केले. यानंतर, घोडेबाजाराला घाबरलेल्या काँग्रेसने सुरक्षिततेचा उपाय म्हणून अपक्ष आमदार अशोक खेनीसह यशवंतपूरचे आमदार सोमाशेखर यांच्या नेतृत्वाखाली १४ आमदार मुंबईला रवाना केले. या आमदारांचा मुक्काम सध्या मुंबईच्या जेडब्लू मॅरियट हॉटेलात आहे. हे आमदार १0 जून रोजी बंगलुरूला परतणार असून, ११ जून रोजी मतदानात भाग घेतील. त्यापूर्वी निवडणूक पुढे ढकलू नये व मतदान नियोजित वेळीच व्हावे, या मागणीसाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाचे दार ठोठावले.>विधानसभेतले पक्षीय संख्याबळकर्नाटक विधानसभेत काँग्रेस १२३, भाजपा ४४, जद (से) ४0, अपक्ष ९, अन्य छोटे पक्ष ७ व नामनियुक्त १ अशा २२५ सदस्यांचे संख्याबळ आहे. काँग्रेसच्या तिसऱ्या उमेदवाराला १३, भाजपाला १ तर जद(से)उमेदवाराला १0 मतांची गरज आहे. सर्व पक्षांची नजर अपक्ष ९, अन्य पक्षांच्या ७ आमदारांवर आहे. अशा वातावरणात घोडेबाजाराला उत्तेजन मिळू नये, यासाठी काँग्रेसने १४ आमदारांना मुंबईला हलवले, तर भाजपाने ही निवडणूकच पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.