शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

पंतप्रधानांपेक्षा काँग्रेस अध्यक्षांचे निवासस्थान मोठे

By admin | Updated: December 31, 2015 11:44 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे १० जनपथ निवासस्थान क्षेत्रफळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ रेसकोर्सवरील बंगल्यापेक्षा मोठे आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३१ -  दिल्लीतल्या राजकारणात नेत्याचे स्थान, राजकीय वजन याबरोबरच नेत्यांच्या निवासस्थानांचीही माध्यमांमध्ये चर्चा होते. दिल्लीतील नेत्यांच्या निवासस्थानांबद्दल माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार खासदार व काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे निवासस्थान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानापेक्षा अधिक मोठे आहे.
सोनिया गांधी यांचे १० जनपथ निवासस्थान क्षेत्रफळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७ रेसकोर्सवरील बंगल्यापेक्षा मोठं आहे. 
दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि उपराष्ट्रपती हमीद अन्सारी या दोघांचीच निवासस्थाने १० जनपथ पेक्षा मोठी आहेत. पण राष्ट्रपती भवन आणि उपराष्ट्रपतींचे ७ आरसीआर ही सरकारी निवासस्थाने आहेत. १० जनपथ हे निवासस्थान सोनिया गांधींना मंजूर करण्यात आले आहे. 
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम खात्याने दिलेल्या माहितीनुसार १० जनपथचे क्षेत्रफळ १५,१८१ स्क्वेअर मीटर आहे तर, पंतप्रधानांच्या ७ रेसकोर्सचे क्षेत्रफळ १४,१०१ स्क्वेअर मीटर आहे. देव आशिष भट्टाचार्य यांना माहितीच्या अधिकारातून ही माहिती मिळाली आहे.
 
 दिल्लीत राष्ट्रपती भवन सर्वात मोठे निवासस्थान आहे. राष्ट्रपती भवन ३२० एकरमध्ये पसरलेले आहे. जगातील कोणत्याही देशाच्या राष्ट्रप्रमुखाकडे इतके मोठे निवासस्थान नाही. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे ६ मौलाना आझाद रोडवरील निवासस्थानाचे क्षेत्रफळ २६,३३३.४९ स्कवेअर मीटरमध्ये पसरले आहे. 
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या १२ तुघलक रोडवरील बंगल्याचे क्षेत्रफळ ५,०२२.५८ स्कवेअर मीटर आहे. प्रियंका गांधी वाड्रा यांचा ३५ लोधी इस्टेट रोडवरील बंगल्याचे क्षेत्रफळ २,७६५.१८ स्केवअर मीटर आहे.