शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस पक्षाने स्थापन केला संवादगट

By admin | Updated: July 13, 2017 05:01 IST

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी झारखंडचे प्रभारी म्हणून आर. पी. एन. सिंह आणि छत्तीसगढचे प्रभारी म्हणून पी. एल. पुनिया यांच्यावर जबाबदारी सोपविली

शीलेश शर्मा । लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पक्ष संघटनेत फेरबदल करीत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी झारखंडचे प्रभारी म्हणून आर. पी. एन. सिंह आणि छत्तीसगढचे प्रभारी म्हणून पी. एल. पुनिया यांच्यावर जबाबदारी सोपविली आहे. याशिवाय काँग्रेसने प्रसार माध्यमांसाठी दहा सदस्यांचा एक संवाद गट स्थापन केला आहे.या संवादगटाची दररोज बैठक घेऊन काँग्रेस पक्षाच्या मीडिया विभागाला सहाय्य करील, असे काँग्रेसचे सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांनी सांगितले.उच्चपदस्थ सूत्रांनुसार राहुल आणि चीनच्या राजदूतांदरम्यान झालेल्या चर्चेवरून प्रसार माध्यमात पक्षाची जी पंचाईत झाली होती, त्यावर सोनिया आणि राहुल हे नाराज होते. कारण सुरजेवाला यांचे वक्तव्य आणि टिष्ट्वटमुळे या चर्चेने पक्ष नेतृत्वाची द्विधा स्थिती झाली होती. ही चर्चा झाल्याचे मान्य करावे की, नाही? अखेर राहुल यांना हस्तक्षेप करावा लागला. त्यांनीच टिष्ट्वट करून चीनच्या राजदूतांशी चर्चा झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तथापि, त्याचवेळी असेही ठरविण्यात आले की, सल्लामसलतीशिवाय कोणतीही घोषणा केली जाणार नाही.दोन दिवस व्यापक चर्चा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी ८ बड्या नेत्यांची मीडियासाठी संवाद रणनीती गट स्थापन केला. यात मल्लिकार्जुन खडगे, गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, पी. चिदंबरम, मणिशंकर अय्यर,जयराम रमेश, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सुष्मिता देव यांचा समावेश करण्यात आला आहे. झारखंडचे नवनियुक्त प्रभारी आर. पी. एन. सिंह यांच्यासोबत उमंग सिंह आणि मैनुल हाक्वे हे सचिव म्हणून काम करतील. छत्तीसगढमध्ये पुनिया यांच्यासोबत कमलेश्वर पटेल आणि अरूण ओरोओ सचिव असतील