शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

संसदेत काँग्रेसचे विधायक सहकार्य

By admin | Updated: June 9, 2014 03:34 IST

राज्यसभेत अल्पमतात असलेल्या रालोआ सरकारची अडवणूक न करता विधायक सहकार्याची भूमिका बजावणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत.

हरीश गुप्ता, नवी दिल्लीराज्यसभेत अल्पमतात असलेल्या रालोआ सरकारची अडवणूक न करता विधायक सहकार्याची भूमिका बजावणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले आहेत.३० पक्षीय रालोआकडे राज्यसभेत बहुमत नसल्याने आडकाठी करीत काँग्रेस महत्त्वाच्या विधेयकांचा मार्ग रोखून धरेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत होती. ट्राय कायद्यात दुरुस्ती करणारा वटहुकूम आणण्याची तयारी रालोआ सरकारने केली असून त्याद्वारे नृपेंद्र मिश्रा यांची पंतप्रधानांचे प्रधान सचिव म्हणून केल्या जाणाऱ्या नियुक्तीला कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल, या वटहुकुमाला विरोध न करता तो एकमताने पारित होण्यावर काँग्रेसचा भर राहील. हा वटहुकूम पारित करण्यासाठी रालोआला संयुक्त अधिवेशन बोलावण्याची आवश्यकता भासेल, असे सोनिया आणि राहुल गांधी यांच्या निकटस्थ ज्येष्ठ काँग्रेस नेत्याला कळविण्यात आले आहे. केवळ विरोधाला विरोध करायचा म्हणून आम्ही कोणत्याही विधेयकाचा मार्ग अडवून धरणार नाही, असे या नेत्याने भाजपाच्या संबंधित नेत्याकडे स्पष्ट केले आहे.भाजपानेही भू-संपादन आणि अन्य महत्त्वाची विधेयके पारित करण्यात संपुआ सरकारला मदतच केली होती. ट्राय कायद्यानुसार ट्रायच्या अध्यक्षाला निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद स्वीकारता येत नाही. या वेळी नृपेंद्र मिश्रा यांच्या नियुक्तीसाठी या कायद्यात बदल केला जाणार आहे. न्यायालयीन उत्तरदायित्व, इलेक्ट्रॉनिक पुरवठा सेवा, कोळसा नियामक प्राधिकरण विधेयक, अणू सहकार्य नियामक प्राधिकरणासारखी विधेयके राज्यसभेत प्रलंबित आहेत. सर्व पक्षांमध्ये सहमती झाल्यास या विधेयकांचा मार्ग प्रशस्त होईल. काँग्रेसने मल्लिकार्जुन खरगे यांची लोकसभेच्या पक्षनेतेपदी निवड करीत विधायक सहकार्याचे संकेत दिले आहेत.