शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महिला उमेदवार देण्यात काँग्रेस आघाडीवर

By admin | Updated: September 30, 2014 01:06 IST

भाजपा-सेनेतून महिलांना उमेदवारी नाही : पश्‍चीम व-हाडातील चित्र.

राजेश शेगोकार /बुलडाणा युती व आघाडीच्या राजकारणात आतापर्यंंत केवळ एकच जागा व त्यातही मित्रपक्षाची अडजेस्टमेंट करण्यासाठी आपल्याच पक्षातील नेत्यांना विशेषता: महिलांना उमेदवारीपासुन वंचीत ठेवण्यात येत होते.यावेळी मात्र युती व आघाडी दुभंगल्यामुळे राजकीय पक्षांसमोर जागा उपलब्ध असतानाही केवळ काँग्रेस वगळता कुठल्याही राजकीय पक्षाने महिलांना उमदेवारी दिली नाही हे स्पष्ट झाले आहे. येनवेळी युती व आघाडीतील पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने उमेदवार निवडीसाठी प्रचंड गोंधळ उडाला या गोंधळामध्ये ह्यआयातह्ण उमेदवारांना अधिकृत उमेदवारीची लॉटरी लागली. स्वबळाचे बळ आजमावतांना आपण त्यामध्ये कमी पडू नये यासाठी प्रत्येक पक्षाची धडपड आहे त्यामुळे काही करा पण जागा जिंका या सं ख्येच्या गणीतासाठी आपल्याच पक्षातील महिला नेत्यांना पुन्हा डावलण्यात आले आहे. काँग्रेसने अकोला जिल्ह्यातील अकोला पश्‍चीम व वाशीम जिल्ह्यातून कारंजा या म तदारसंघातुन अनुक्रमे उषा विरक व ज्योती गणेशपुरे यांना उमेदवारी दिली आहे. या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा,सेना या प्रमुख पक्षांनी महिलांच्या मताचे राजकारण करतांना महिलांनाच उमेदवारी नाकारल्याचे समोर आले आहे.

** राष्ट्रवादीची एकमेव उमेदवारीही नाकारली

     राष्ट्रवादी काँग्रेसने बुलडाण्यातील जळगाव जामोद मतदारसंधासाठी माजी नगराध्यक्षा डॉ.स्वाती वाकेकर यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांनी ती नाकारली. लोकसभा निवडणुकीत त्याचे वडील माजी आमदार कृष्णराव इंगळे यांचा पराभव झाला. हा जनादेश मान्य असल्यामुळे लगेचच निवडणुक न लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यामुळे राष्ट्रवादीचा महिला कोटा रिक्तच राहिला आहे.

 ** विदर्भात महायुतीच्या घटक पक्षांचे आव्हान संपले

   महायुतीमध्ये सहभागी असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व शिवसंग्राम या दोन्ही पक्षाचे आव्हान संपल्यागत जमा आहे. या पक्षांनी पश्‍चिम वर्‍हाडातील चिखली, रिसोड व बाळापुर या मतदारसंघाची मागणी करून आपला भाजपावर दबाव ठेवला होता मात्र आता महायुती दूंभगल्यावरही या पक्षांची अपेक्षा पुर्ती झालेली नाही. स्वाभिमानीची मतदारसंघाची मागणी पुर्ण न झाल्यामुळे विदर्भातील एकाही मतदारसंघात स्वाभिमानीचा उमेदवार राहणार नाही. काही ठिकाणी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केले असले तरी तेथे भाजपाचा उमेदवार असल्यामुळे असे अर्ज मागे घेतल्या जाणार आहेत. विदर्भातील चिखली या मतदारसंघासाठी स्वाभिमानीचा सर्वाधीक जोर होता मात्र काल पत्रकार परिषद घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपा सोबत राहण्याचा निर्णय जाहिर केला.