शहरं
Join us  
Trending Stories
1
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
2
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
3
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
4
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
5
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
6
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
7
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
8
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
9
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
10
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
11
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
12
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
13
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
14
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
15
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
16
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
17
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
18
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
19
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
20
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात

भगव्या दहशतवादाच्या नावाखाली काँग्रेसनं अडकवलं - साध्वी प्रज्ञा सिंह

By admin | Updated: April 27, 2017 17:31 IST

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंग आज जामिनावर तुरुगांतून बाहेर आल्या आहेत.

ऑनलाइन लोकमतभोपाळ, दि. 27 - 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह आज जामिनावर तुरूंगातून बाहेर आल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेसवर टीका केली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या नऊ वर्षांच्या अन्यायातून मुक्त झाले आहे, आता स्वतःवर योग्य उपचार करुन घेणार आहे. यावेळी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी हायकोर्टाचे आभार मानले. तसेच गेल्या 9 वर्षांत दहशतवादाला बळी पडलेल्या शहिदांना श्रद्धांजली वाहिली. भगवा दहशतवाद हा काँग्रेसने रचलेला कट होता, असा आरोप करत या कटाची मी बळी झाल्याचे साध्वींनी म्हटले. यामुळे तब्बल नऊ वर्षे आपल्यावर अन्याय झाल्याचेही त्यांनी सांगितले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या, "स्वतंत्र भारताच्या इतिहासात मला जो त्रास सहन करावा लागला, तसा कोणत्याही महिलेला करावा लागला नसेल. तब्बल नऊ वर्षे तुरुंगात अनेक पीडा सहन कराव्या लागल्या. मला झालेल्या आजाराला एटीएस जबाबदार आहे." 
 
आडीच वर्षे साध्वी प्रज्ञा सिंह यांनी भोपाळ येथील पंडित खुशीलाल शर्मा या सरकारी आयुर्वेदिक महाविद्यालात उपचार घेतला आहे. साध्वी यांना स्तनाचा कर्करोग झाला असून, सध्या त्यांची तब्येत नाजूक असून आधार घेतल्याशिवाय त्यांना चालताही येत नाही.  
मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने साध्वी यांचा जामीन अर्ज गेल्या वर्षी 28जून रोजी, तर पुरोहितचा जामीनअर्ज 29 सप्टेंबर रोजी फेटाळला होता. याविरुद्ध या दोघांनी केलेल्या अपिलांवर फेब्रुवारीत राखून ठेवलेले निकाल न्या. रणजीत मोरे व न्या. डॉ. शालिनी फणसाळखर-जोशी यांच्या खंडपीठाने मंगळवारी जाहीर केला. आधी एटीएस व नंतर एनआयएने सादर केलेल्या तपास अहवालांचा एकत्रितपणे विचार केला तरी साध्वीवर केले गेलेले आरोप खरे मानण्यास प्रथमदर्शनी काही आधार दिसत नाही, असा निष्कर्ष खंडपीठाने 78 पानी निकालपत्राच्या अखेरीस नोंदविला.