शीलेश शर्मा - नवी दिल्ली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे पक्षाचे मुख्य प्रचारक असतील व प्रचारात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रामुख्याने लक्ष्य करतील, असे पक्षाच्या वरिष्ठ सूत्रंकडून समजते.
सूत्रंनुसार प्रचारात काँग्रेस मोदी यांच्या ‘अच्छे दिन’च्या फसव्या आश्वासनांवर खास करून भर देईल. प्रत्येक प्रचारसभेत ‘अच्छे दिन कुठे दिसतायत का’, असा थेट सवाल श्रोत्यांना करून राहुल गांधी मोदींच्या ‘बुरे दिन’चा पाढा वाचतील.
पंतप्रधान मोदी यांच्या महाराष्ट्रात अनेक ‘धुंवाधार’ सभा घेऊन वातावरण पूर्णपणो ढवळून काढण्याची रणनीती भारतीय जनता पार्टीने आखल्याची माहिती काँग्रेसला मिळाली आहे. त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी राहुल गांधी यांनी राज्यात निवडणूक काळात जवळजवळ कायमस्वरूपी तळ ठोकून जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, असे त्यांना सुचविण्यात आले आहे. पक्षाने ही निवडणूक पूर्णपणो स्वबळावर लढवावी, असा राहुल गांधींचाच
आग्रह होता त्यामुळे त्यांच्यासाठी महाराष्ट्राची निवडणूक अधिक प्रतिष्ठेची आहे, असे राहुल गांधींचे पक्षातील शिलेदार मानतात.
सूत्रंनुसार लोकसभा निवडणुकीच्या निकालाने हतोत्साहित न होता पक्षाने महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी पूर्ण ताकदीनिशी कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून स्वत: पक्षाध्यक्षा सोनिया गांधी याही हरियाणाच्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रचारासाठी अधिक वेळ देतील. पक्षाचे हे दोन्ही शीर्षस्थ नेते एकाच वेळी एकाच प्रदेशात अडकून पडणार नाहीत, अशा प्रकारे प्रचारसभांचे आयोजन केले जाईल. त्यानुसार ज्या दिवशी सोनिया
गांधी महाराष्ट्रात असतील त्या
दिवशी राहुल गांधी हरियाणात प्रचार करतील. महाराष्ट्रातही राहुल विदर्भात असतील तर सोनिया गांधी मराठवाडय़ात आणि राहुल मुंबईत तर सोनिया गांधी कोकणात अशी सभांची आखणी केली जाईल.
उपलब्ध संकेतांनुसार महाराष्ट्रात राहुल गांधींच्या सुमारे 1क् तर सोनिया गांधी यांच्या चार प्रचार सभा
होतील. खरे तर हरियाणातील काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधींना सहा सभा घेण्याची विनंती केली होती, पण महाराष्ट्राकडे अधिक लक्ष देता यावे यासाठी त्यांनी तेथील दोन सभांना कात्री लावल्याचेही समजते.
मनमोहन सिंगही उतरणार मैदानात
च्पक्षाच्या सूत्रंनुसार माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हेही महाराष्ट्रात पक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार आहेत. याशिवाय कॅ. अमरिंदर सिंग, गुलाम नबी आझाद, सलमान खुर्शिद, शीला दीक्षित, ज्योतिरादित्य शिंदे, सचिन पायलट, आनंद शर्मा, राज बब्बर आणि अझरुद्दीन या नेत्यांनाही प्रचारासाठी उतरविणार आहे. हिंदीभाषी व खासकरून उत्तर भारतीय मतदारांना गळाला लावण्यासाठी लालूप्रसाद यादव यांच्यासह इतरही काही नेत्यांनी प्रचारासाठी यावे यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत.