काँग्रेस नेत्यांच्या नरसंहारातील मुख्य सूत्रधार ठार
By admin | Updated: September 20, 2015 00:53 IST
मलकानगिरी (ओडिशा): २०१३ साली छत्तीसगडमध्ये व्ही.सी. शुक्ला आणि महेंद्र कर्मा यांच्यासह जवळपास ३० वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार शनिवारी ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ातील जंगलात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ठार झाला.
काँग्रेस नेत्यांच्या नरसंहारातील मुख्य सूत्रधार ठार
मलकानगिरी (ओडिशा): २०१३ साली छत्तीसगडमध्ये व्ही.सी. शुक्ला आणि महेंद्र कर्मा यांच्यासह जवळपास ३० वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार शनिवारी ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यातील जंगलात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ठार झाला.मृत सोनाधर याच्यासह त्याच्या दोन अंगरक्षकांचाही खात्मा करण्यात आला आहे. मलकानगिरीचे पोलीस अधीक्षक मित्रभानु महापात्र यांनी सांगितले की, गोपनीय सूचनेच्या आधारे विशेष अभियान दल (एसओजी) आणि जिल्हा व्हॉलेंटरी फोर्सच्या (डीव्हीएफ)संयुक्त पथकाने माथिली क्षेत्रातील भेजागुडा जंगलात एक मोहीम राबविली. त्यादरम्यान माओवाद्यांच्या गटाशी त्यांचा आमनासामना झाला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत दरभा (छत्तीसगड)माओवादी डिव्हिजन कमिटीचा सचिव सोनाधर आणि त्याचे दोन अंगरक्षक ठार झाले तर अन्य काही फरार झाले. घटनास्थळावरून एक पिस्तूल, काही धारदार शस्त्रे, वॉकीटॉकी सेट, माओवाद्यांचे पोशाख आणि काही नक्षल साहित्य जप्त करण्यात आले.२५ मे २०१३रोजी छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या दरबा घाटीत झालेल्या माओवादी हल्ल्यात काँग्रेसचे अनेक नेते मृत्युमुखी पडले होते. या हल्ल्यात सलवा जुडूम हे नक्षलविरोधी अभियान राबविणारे माजी गृहमंत्री कर्मा सुद्धा ठार झाले होते. (वृत्तसंस्था)