शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस हायकमांड ‘रुटलेस वंडर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2015 03:44 IST

दिल्लीतील बंद वातानुकूलित खोलीत डोळे बंद करून बसलेल्या काँग्रेस हायकमांडने गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या कार्याची दखल घेतली

पणजी : दिल्लीतील बंद वातानुकूलित खोलीत डोळे बंद करून बसलेल्या काँग्रेस हायकमांडने गोव्याचे माजी मुख्यमंत्री डॉ. विल्फ्रेड डिसोझा यांच्या कार्याची दखल घेतली नाही, अशी टीका काँग्रेसच्या माजी प्रभारी आणि माजी राज्यपाल मार्गारेट अल्वा यांनी रविवारी केली. डॉ. डिसोझा यांच्यावरील पुस्तक प्रकाशनासाठी त्या पणजीत आल्या असता त्यांनी काँग्रेस हायकमांडला ‘रुटलेस वंडर’ असे संबोधले. पुस्तक प्रकाशन सोहळ््यानिमित्त चर्चासत्रात बोलताना अल्वा यांनी डिसोझा यांच्या कार्याची दखल न घेतल्याबद्दल काँग्रेस हायकमांडवर टीका केली. काँग्रेसच्या गोव्यातील प्रभारी असताना आपण स्वत: त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले; परंतु आपले प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. दिल्लीतील वातानुकूलित खोलीच्या बंद दरवाज्याप्रमाणेच त्यांचे डोळेही बंद असावेत, असा टोमणाही त्यांनी हाणला. प्रत्यक्ष कुणाही व्यक्तीचे नाव न घेता काँग्रेस हायकमांडवर हल्ला चढविताना त्यांनी सांगितले की, गोव्यातील वस्तुस्थिती समजावून न घेता हायकमांडने अनेक निर्णय घेतले. त्यामुळे अनेक कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा केवळ गैरसमजुतीतून अव्हेर करण्यात आला आणि डॉ. डिसोझा हे त्यापैकी एक आहेत. डॉ. डिसोझा यांच्या जीवनावर लिहिलेल्या डॅनियल आल्बुकर्क यांच्या पुस्तकात अजूनही अनेक गोष्टींचा उल्लेख राहिल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. डिसोझा यांच्याशी अगदी जवळचा संबंध असलेले बाबू नायक व इतर व्यक्तींचा उल्लेख त्यात नसल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)