शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसनेच भारतात घराणेशाही आणली

By admin | Updated: June 27, 2016 04:13 IST

देशात आणीबाणी लागू करण्याला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी काँग्रेसवर निशाणा साधला.

नवी दिल्ली : देशात आणीबाणी लागू करण्याला ४१ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी काँग्रेसवर निशाणा साधला. तब्बल दोन दशके रखडलेल्या आर्थिक सुधारणा, भारताची लोकशाही ‘घराणेशाही’त परिवर्तीत आणि भ्रष्टाचारास सर्वस्वी काँग्रेसच जबाबदार आहे, असा स्पष्ट आरोप जेटली यांनी केला.काँग्रेसच्या खात्यात आणीबाणीशिवाय सुवर्ण मंदिरातील आॅपरेशन ब्लू स्टार राबविल्याचाही कलंक लागलेला आहे. या मुद्यांवर सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाचे काही मत आहे काय? स्वातंत्र्यानंतरच्या काँग्रेस पक्षावर दृष्टिक्षेप टाकला तर या पक्षावर आर्थिक सुधारणांमध्ये दोन दशकांचा विलंब लावणे, भारताच्या लोकशाहीचे घराणेशाहीत रूपांतर करणे, १९७५ मध्ये आणीबाणी लागू करणे, आॅपरेशन ब्लू स्टार आणि भ्रष्टाचार यांसारखे अनेक कलंक लागले आहेत, असे जेटली म्हणाले.४१ वर्षांपर्वी २६ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. त्यानिमित्त ‘४१ वर्षांपूर्वी इंदिरा गांधींनी लागू केलेली संवैधानिक हुकूमशाही’ या शीर्षकाखाली जेटली यांनी आपल्या फेसबुक पोस्टवर हे भाष्य केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क) >हुकूमशाही आणली‘आणीबाणीचा परिणाम देशात हुकूमशाही लागू करण्यात झाला. सर्व राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबण्यात आले. याविरुद्धच्या याचिकांवर सुनावणी करण्याचे न्यायालयांचे अधिकार काढून घेण्यात आले. हुकूमशाहीपुढे न्यायालय नतमस्तक झाले. प्रेस सेंसॉरशीप लागू करण्यात आली. मीडियाही हुकूमशहांचा प्रवक्ता बनला. सार्वजनिक स्थळी निदर्शने करण्यास बंदी घालण्यात आली. त्यावेळी संसदेत विरोधी पक्षही नव्हता. हुकूमशहाने आपला पुत्र संजयला आपला उत्तराधिकारी म्हणून पुढे करून भारताला घराणेशाही व्यवस्थेत रूपांतरित केले. पक्षाच्या अंतर्गत लोकशाहीचा गळा आवळण्यात आला,’ असेही जेटली यांनी म्हटले आहे.