शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीवर काँग्रेसची ‘भूकंप’ पुस्तिका

By admin | Updated: January 1, 2017 01:16 IST

नोटाबंदीच्या निर्णयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आतापर्यंत जे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले व जे मुद्दे उपस्थित केले त्यांचा समावेश असलेल्या ‘भूकंप’

- शीलेश शर्मा,  नवी दिल्लीनोटाबंदीच्या निर्णयानंतर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आतापर्यंत जे प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारले व जे मुद्दे उपस्थित केले त्यांचा समावेश असलेल्या ‘भूकंप’ नावाच्या १६ पानांच्या पुस्तिकेचे प्रकाशन काँग्रेसने केले.‘भूकंप’च्या प्रस्तावनेमध्येही मोदी यांच्यावर हल्ला केला आहे. त्यात म्हटले आहे की मोदी यांना भारत समजलाच नाही. कारण ज्या काळ््या पैशासाठी त्यांनी नोटा चलनातून बाद केल्या त्याचे प्रमाण अर्थव्यवस्थेत केवळ ६ टक्के आहे. पक्षाचे खासदार राजीव गौडा यांनी असा युक्तिवाद केला की छापे घालून ज्या नोटा जप्त केल्या त्या तर नोटाबंदी न करताही करता आल्या असत्या.पक्षाचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी भाजपच्या बँक खात्यांचा तपशील जाहीर करून सांगितले की भाजपने आणि त्याच्या नेत्यांनी कुठे कुठे काळापैसा साठवून ठेवला आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर त्यांनी टीका करताना सांगितले की शाह यांच्या सांगण्यावरूनच अहमदाबाद सहकारी बँकेत ५०० कोटी रुपये जमा करण्यात आले कारण काय तर शाह हे त्या बँकेचे संचालक आहेत. सूरजेवाला म्हणाले की मोदी हे असे पंतप्रधान आहेत की त्यांच्या शब्दाला काही मोल नाही. त्यांनी ५० दिवस मागितले होते व सगळे काही सुरळीत होईल, असे म्हटले होते. ५० दिवस संपले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)