शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

प्रणव मुखर्जींच्या संघभेटीच्या निर्णयाने काँग्रेसमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 05:14 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सात जून रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला मोठाच धक्का बसला आहे.

शीलेश शर्मानवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सात जून रोजी नागपूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होण्याच्या माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निर्णयाने काँग्रेस पक्षाला मोठाच धक्का बसला आहे. सोशल मीडियावरही याबाबत मुखर्जी यांच्यावर टीका होत आहे. मात्र मुखर्जी यांच्या कार्यालयाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार पक्षाचे अत्यंत वरिष्ठ नेते सध्या मुखर्जी यांच्या या निर्णयावर चांगलेच नाराज आहेत. परंतु त्यावर कोणी काही बोलायला तयार नाही. पक्ष प्रवक्त्याने मुखर्जी हे माजी राष्ट्रपती असून, त्यांच्या निर्णयावर पक्ष काही प्रतिक्रिया देणार नाही, असे म्हटले. सर्वाेच्च राष्ट्रपतीपद भूषवल्यानंतरही मुखर्जी यांची राजकीय महत्त्वाकांक्षा अजून कायम आहे व आगामी निवडणुकीत स्पष्ट जनादेश न मिळाल्यास ते पंतप्रधानपदाचे दावेदार होऊ शकतात, अशीही चर्चा आता सुरु आहे.काँग्रेसमध्ये मुखर्जींच्या निर्णयाने खळबळ निर्माण झाली आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र आनंदात आहे. संघाचे ज्येष्ठ नेते राकेश सिन्हा म्हणाले की, प्रणव मुखर्जी यांचा हा महत्त्वाचा निर्णय आहे व संघ आणि हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारणाºयांना यातून मोठा संदेश मिळेल. मुखर्जी हे कार्यक्रमात संघ स्वयंसेवकांना मार्गदर्शन म्हणून काय भाषण करतात, याकडे काँग्रेसचे आता लक्ष आहे. आपल्या कार्यक्रमातील उपस्थितीद्वारे मुखर्जी संघाच्या विचारधारेलाच मान्यता देत आहेत, अशी टीका एका काँग्रेस नेत्याने खासगीत केली. मुखर्जी हे सुरवातीपासूनच धर्मनिरपेक्ष विचारांचे नेते असून, त्यांच्या संघातील कार्यक्रमाच्या हजेरीने काँग्रेसच्या विचारप्रवाहाला धक्का बसेल, असे काही ते बोलणार नाहीत. काँग्रेसचे प्रवक्ते टॉम वडकन यांनी स्पष्ट केले की संघ आणि काँग्रेस यांची वैचारिक बैठक परस्परविरोधी असून, त्याची जाणीव मुखर्जी यांना आहे.याचे उत्तर माजी राष्टÑपतीच देऊ शकतील - काँग्रेसमाजी माहिती व प्रसारण मंत्री मनीष तिवारी यांनी प्रणव मुखर्जी यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल विचारता ते म्हणाले की, फक्त तेच उत्तर देऊ शकतील. पक्षाचे नेते पी. चिदम्बरम, अशोक गेहलोत, गुलाम नबी आझाद आदींनी मुखर्जी यांच्या त्या निर्णयावर नाराजी व्यक्त केल्याचे समजते. मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी यांच्याकडे पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नुकतीच पक्ष संघटनेची महत्त्वाची जबाबदारी दिल्याचे प्रणव मुखर्जी यांना माहीत असतानाही त्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हायचा निर्णय घेतला आहे.