शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

सुरळीत कामकाज हीच संगमा यांना श्रद्धांजली...

By admin | Updated: March 4, 2016 19:03 IST

एकापाठोपाठ विश्वासमताचे ठराव लोकसभेने पाहिले आणि यासर्वांचे संचलन करणारे आणि सभागृहातील सर्व घडामोडींचे साक्षीदार होते पूर्णो अगिटोक संगमा

ओंकार करंबेळकर१९९६ च्या निवडणुकीचे निकाल लागले आणि एका त्रिशंकू लोकसभेला आपल्याला सामोरे जावे लागले. सर्वप्रथम अटलबिहारी वाजपेयी यांना विश्वासमतास सामोरे जावे लागले, मात्र तेरा दिवसांमध्येच त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले, पाठोपाठ एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांचे  सरकार त्यानंतरच्या दोन वर्षांमध्ये सत्तेमध्ये आले. एकापाठोपाठ विश्वासमताचे ठराव लोकसभेने पाहिले आणि यासर्वांचे संचलन करणारे आणि सभागृहातील सर्व घडामोडींचे साक्षीदार होते पूर्णो अगिटोक संगमा. सतत हसतमुख असणाºया या माणसाने या त्रिशंकू वातावरणात सभागृह केवळ चालवले नाहीच तर सदस्यांना शिस्तीचे धडे देत त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीची जाणिव करुन दिली. त्यांच्या निधनामुळे केवळ ईशान्य भारतच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातील एक महत्वाची व्यक्ती आपण गमावली आहे.    एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल, रामविलास पासवान, शरद पवार असे नेते एका बाजूस आणि दुसº़या बाजूस अटलबिहारी वाजपेयी, मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, विजयाराजे सिंदीया अशा एकाहून अधिक सरस वक्त्यांची दोन्हीबाजूस मांदियाळी. यासर्वांच्या एकमेकांवर प्रखर टीकेची भाषणे सभागृहात गोंधळ न देता होऊ देण्यास पी. ए. संगमा यांचाच मोठा वाटा होता. गोंधळ घालणाºया किंवा अडथळे आणणाºया सदस्यांना कडक आवाजात ओरडण्याऐवजी कम आॅन... कम आॅन प्लीज अशा शब्दांमध्ये ते शांत करत तर कधी प्लीज बिहेव्ह... व्होल नेशन इज वॉचिंग यू अशा शब्दांमध्ये आपल्याला दूरदर्शनद्वारे सर्व देश पाहात असल्याची जाणीव करुन देत. सभागृह संचलनाचा त्यांनी एकप्रकारे आदर्श वस्तूपाठच यामधून घालून दिला. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी बोलण्यास उभे असताना विरोधकांबरोबर सत्ताधारी खासदारांचेही आवाज येत असताना, तुमचेच पंतप्रधान बोलत आहेत अशा शब्दांमध्ये त्यांनी भाजपाला सुनावले तेव्हा तत्कालीन मंत्री प्रमोद महाजन यांनी सर, ते आपले सर्वांचे पंतप्रधान आहेत अशी त्यांची चूक लक्षात आणून दिली होती. संगमा यांनी तात्काळ माफी मागत 'अवर' प्राइम मिनिस्टर असे म्हणत स्वत:ची चूक सुधारण्यात मनाचा मोठेपणा दाखवून दिला. त्यांच्या या हसतमुख वागण्याबद्दल लोकसभेच्या सध्याच्या सभापती सुमित्रा महाजनही त्यांना श्रद्धांजली वाहताना म्हणाल्या, 'हसतमुख राहून सभागृहाचे संचलन कसे करावे हे मी संगमा यांच्याकडून शिकले.'     संगमा यांचे नाव आणखी एका बाबतीत घ्यावे लागेल ते म्हणजे ईशान्य भारतीय व्यक्तीचे राष्ट्रीय राजकारणातील स्थान. १९७७ च्या निवडणुकीपासून संगमा सतत जिंकत आले. २००८ साली संसद सदस्यपदाचा राजीनामा देईपर्यंत ते अधूमधून मेघालयच्या अंतर्गत राजकारणातही ते डोकावत होते. दोन वर्षांसाठी ते मेघालयचे मुख्यमंत्रीही झाले. पण केंद्रामध्ये विविध जबाबदाºया व लोकसभेची अल्पकाळ मिळालेली जबाबदारी यामुळे त्यांनी राष्ट्रीय राजकारणावर स्वत:चा ठसा निर्माण केला आणि स्वत:चे स्थानही मिळविले. त्यांच्यानंतर अगाथा संगमा आणि आता किरेन रिजूजू यांच्या निमित्ताने ईशान्य भारतातील नेतृत्वगुणांचा परिचय आपल्याला होत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि शेवटी एनपीए असा विविध पक्षांमध्ये त्यांचा राजकीय प्रवास झाला मात्र कडवटपणा, विखारी टीका त्यांच्या हसतखेळत राहण्याच्या स्वभावामुळे कधीही आला नाही. आज वारंवार होणाºया सभागृहातील घोषणाबाजी, अडथळे, ठप्प होणारे प्रश्नोत्तराचे तास अशा वातावरणामध्ये संगमा यांनी सांगितलेल्या वाटेवरुन संसद सदस्यांनी जाणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली होऊ शकेल.सुवर्णमहोत्सवी सभेचे सभापती१९९७ साली भारताच्या स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पुर्ण झाल्याबद्दल देशभरामध्ये विविध कार्यक्रम सादर केले गेले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहाच्या सदस्यांचू एकत्रित विशेष सभा घेण्यात आली. यावेळेस भारतरत्न लता मंगेशकर आणि पं. भीमसेन जोशी यांचे गायनही झाले होते. याविशेष सभेचे संचलन करण्याची सुवर्णसंधी पी. ए. संगमा यांना मिळाली होती.