शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांनी केले मोदींचे अभिनंदन!

By admin | Updated: March 28, 2017 04:37 IST

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रात्री भारताचे पंतप्रधान नरेंद् मोदींशी फोनवरून चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आज रात्री भारताचे पंतप्रधान नरेंद् मोदींशी फोनवरून चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी हल्लीच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या विजयाबद्दल मोदींचे अभिनंदन केले. व्हाइट हाऊसने हे वृत्त दिले आहे. व्हाइट हाऊसचे माध्यम सचिव शॉन स्पायसर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की ट्रम्प यांनी मोदींना फोन करून निवडणुकीतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या. 
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर आणि गोवा येथे झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने लक्षणीय यश मिळवले होते. या पाच राज्यांपैकी चार राज्यात भाजपाने सरकार स्थापन केले होते. मात्र पंजाबमध्ये भाजपाला काँग्रेसकडून दारुण पराभव पत्करावा लागला होता. 
या निवडणुका भाजपाने स्थानिक नेतृत्वाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या गेल्या होत्या. या निवडणुकीत भाजपाला उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये दणदणीत यश मिळाले होते. पैकी उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. उत्तर प्रदेशमध्ये तब्बल 14 वर्षांनंतर सत्तेत पुनरागमन करण्यात भाजपाने यश मिळवले होते. मोदींनी घेतलेल्या  नोटबंदीसारख्या कठोर निर्णयानंतर भाजपाला मिळालेले यश मोदींच्या नेतृत्वामुळे मिळाल्याचे मानले जात आहे.