शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सदस्याच्या विधानावरून गोंधळ

By admin | Updated: December 10, 2015 23:15 IST

दुष्काळावरील चर्चेत भाजपचे खासदार वीरेंद्रसिंग यांनी काँग्रेस नेत्यांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात, लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीदुष्काळावरील चर्चेत भाजपचे खासदार वीरेंद्रसिंग यांनी काँग्रेस नेत्यांविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह विधानांच्या विरोधात, लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला. ही विधाने कामकाजातून काढून टाकावीत व वीरेंद्रसिंग यांना बिनशर्त माफी मागण्यास सांगावे, अशी मागणी काँग्रेस व तृणमूलच्या सदस्यांनी केली. अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी वादग्रस्त विधाने काढण्याचे आश्वासन दिले; मात्र वीरेंद्र्रसिंग यांनी माफी न मागितल्याने सरकारविरुद्ध घोषणा देत काँग्रेस व तृणमूल सदस्यांनी सभात्याग केला, तर राज्यसभेत सरकारच्या सूडबुद्धीच्या विरोधात सलग तिसऱ्या दिवशी गोंधळ झाल्यामुळे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब झाले.अध्यक्षांकडे सदरप्रकरणी न्याय मागण्याच्या घोषणा देत काँग्रेस सदस्यांनी सलग दोन तास सभागृहात गोंधळ घातला. तेव्हा अध्यक्षा म्हणाल्या, कोणालाही माफी मागण्याची बळजबरी मी करू शकत नाही. यावेळी सत्ताधाऱ्यांचा निषेध करीत काँग्रेसने लोकसभेत सभात्याग केला. तृणमूलचे सुदीप बंदोपाध्याय व सौगत रॉय यांनीही हेच प्रकरण अधोरेखित करीत अध्यक्षांकडून विरोधकांना न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आणि काँग्रेसपाठोपाठ सभात्याग केला. तृणमूल खासदारांचे काँग्रेसबद्दल अचानक वाढलेले प्रेम पाहून सभागृहात सर्वांच्याच भुवया उंचावल्या.(लोकमत न्यूज नेटवर्क)> काय म्हणाले वीरेंद्रसिंगलोकसभेत दुष्काळावरील चर्चेत बोलताना भाजपचे खासदार वीरेंद्रसिंग म्हणाले, ‘काँग्रेस शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत कळवळा तर व्यक्त करते; मात्र या पक्षाचे नेते राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे यासारख्या नेत्यांना ज्वारी, बाजरी आणि गव्हात फरक काय ते देखील समजत नाही. एका गरीब घरातली व्यक्ती देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाली, याची काँग्रेसजनांना खंत आहे. त्यांचा असा समज आहे की, हे पद फक्त गांधी-नेहरू घराण्यासाठीच राखीव आहे.’ वीरेंद्र्रसिंगांच्या उपरोक्त विधानांवर काँग्रेस सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. लोकसभाध्यक्षांनीही वीरेंद्र्रसिंगांना ताकीद देत त्यांची विधाने कामकाजातून काढून टाकणार असल्याचे जाहीर केले. सदस्याने दिलगिरी व्यक्त करावी, असेही अध्यक्षांनी सुचवले; मात्र वीरेंद्र्रसिंगांकडून प्रतिसाद मिळाला नाही. संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडूंनी काँग्रेस सदस्यांच्या वर्तनाचे दाखले देत वीरेंद्र्रसिंगांचे अप्रत्यक्ष समर्थनच केले.