नवी दिल्ली : धर्मांतर, तृणमूल काँग्रेसच्या मंत्र्याला झालेली अटक आणि नाताळला शाळा सुरू ठेवण्याच्या कथित आदेशावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात सोमवारी प्रचंड गोंधळ झाला. गदारोळ थांबत नसल्यामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले.विरोधकांना चर्चेऐवजी गोंधळ घालून कामकाज बंद पाडण्यातच अधिक रस असल्याचा आरोप सरकारतर्फे करण्यात आला, तर सरकार चर्चेबाबत गंभीर नसल्याचा हल्ला विरोधी पक्षाने चढविला.
संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ
By admin | Updated: December 15, 2014 23:35 IST