शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन कसोटीचे...!

By admin | Updated: February 5, 2016 03:11 IST

राज्यसभेत सरकारकडे नसलेले बहुमत जीएसटी विधेयक पारित करण्यासह अरुणाचलमधील राष्ट्रपती राजवटीला मंजुरी मिळविण्यातही बाधक ठरणार आहे

हरीश गुप्ता,  नवी दिल्लीराज्यसभेत सरकारकडे नसलेले बहुमत जीएसटी विधेयक पारित करण्यासह अरुणाचलमधील राष्ट्रपती राजवटीला मंजुरी मिळविण्यातही बाधक ठरणार आहे. येत्या २३ फेब्रुवारीपासून दोन सत्रात सुरू होणारे संसदेचे अधिवेशन मोदी सरकारसाठी कसोटीचे ठरणार असेच संकेत मिळाले आहेत.अर्थसंकल्प २९ फेब्रुवारी रोजी सादर केला जाणार असून, त्याआधी २५ फेब्रुवारी रोजी रेल्वे अर्थसंकल्प मांडला जाईल. या दोन सत्रातील अवकाश काळ ४० दिवसांचा राहणार आहे. दुसरे सत्र २५ एप्रिलपासून सुरू होईल आणि १३ मे रोजी अधिवेशनाचे सूप वाजेल.अधिवेशनाचा पहिला टप्पा १६ मार्च रोजी संपणार असला तरी मधील रजेच्या काळात संसदेच्या स्थायी समित्या मंत्रालयनिहाय अर्थसंकल्पावर चर्चा करणारआहेत. याच काळात निवडणूक आयोग आसाम, तामिळनाडू, केरळ, प. बंगाल आणि पुडुचेरी या पाच राज्यांमधील निवडणूक प्रक्रिया आटोपण्याची शक्यता आहे. सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी मुक्त करता यावे यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ मार्च रोजीच संपविण्याची सरकारची इच्छा होती, मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन थोडक्यात आटोपण्यावर विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला. पूर्वापार चालत आलेली परंपरा मोडीत काढली जाऊ नये, असा सूर विरोधी पक्षांनी लावला.विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडल्याचे आताचे चित्र पाहता, जीएसटी विधेयकाचे भवितव्य अधांतरीच राहणार असल्याचे संकेत आहेत.जीएसटी करदराची कमाल मर्यादा घालून देण्यासंबंधी काँग्रेसची मागणी सरकारने मान्य केलेली नाही. काँग्रेसला आणखी काही पक्षांची साथ मिळाल्यामुळे राज्यसभेत कामकाज चालवणे सरकारसाठी अवघडच ठरणार असे दिसते.जीएसटी विधेयकापूर्वी सरकारला अरुणाचल प्रदेशातील राष्ट्रपती राजवटीला संसदेची मान्यता मिळविणे क्रमप्राप्त ठरणार आहे. राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर दोन महिन्यानंतर मंजुरी मिळविणे अपरिहार्य ठरत असल्यामुळे १६ मार्चपूर्वीच संसदेची माहोर उमटवावी लागणार आहे. प्रादेशिक पक्षांचा असलेला विरोध पाहता सरकारला राज्यसभेत ते शक्य होणार नाही.सर्वोच्च न्यायालयाने निर्णय जाहीर करण्यापूर्वी किंवा संसद अधिवेशनापूर्वीच राष्ट्रपती राजवट मागे घेतल्यास हा गुंता सुटू शकतो, असे सरकारला वाटते.राष्ट्रपती राजवट मागे घेणे हा मोदी सरकारसाठी राजकीयदृष्ट्या मानहानीकारक ठरणार असला तरी दुसरा मार्ग दिसत नाही.