शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
3
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
4
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
5
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
6
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
7
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
8
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
9
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
10
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
11
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
12
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
13
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
14
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
15
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
16
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
17
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
18
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
19
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
20
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  

फिट येऊन पडल्याने तरुणाची मान कापली प्रकृती चिंताजनक : गोलाणी मार्केटमधील फायनान्स कार्यालयातील घटना

By admin | Updated: February 11, 2016 22:59 IST

जळगाव: कार्यालयात दैनंदिन काम करत असताना फिट आल्याने कॅबीनवर कोसळल्याने वसंत जयवंत सुरळकर (वय २८ रा.कुंभारी खुर्द ता.जामनेर) या तरुणाची काच घुसून मान कापली गेली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील श्री स्वामी समर्थ फायनान्स या कार्यालयात घडली. त्याला तातडीने इंडो अमेरिकन या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

जळगाव: कार्यालयात दैनंदिन काम करत असताना फिट आल्याने कॅबीनवर कोसळल्याने वसंत जयवंत सुरळकर (वय २८ रा.कुंभारी खुर्द ता.जामनेर) या तरुणाची काच घुसून मान कापली गेली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी सव्वा बारा वाजेच्या सुमारास गोलाणी मार्केटमधील श्री स्वामी समर्थ फायनान्स या कार्यालयात घडली. त्याला तातडीने इंडो अमेरिकन या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुरळकर हा फायनान्स कार्यालयात वसुली अधिकारी म्हणून नोकरीला आहे. नवीन बसस्थानकाजवळ मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत तो वास्तव्याला आहे. सकाळी अकरा वाजता गोलाणी मार्केटमध्ये दुसर्‍या मजल्यावर असलेल्या श्री स्वामी समर्थ फायनान्स या त्याच्या कार्यालयात आला होता. कामानिमित्त कार्यालयात उभा असताना अचानक त्याला फिट आले.
प्रचंड रक्तस्त्राव
वसंत याची काच घसून मान कापली गेल्याने मानेतून प्रचंड रक्तस्त्राव होत होता. ही घटना पाहून कार्यालयातील सहकार्‍यांमध्ये प्रचंड थरकाप उडाला. सेल्स मॅनेजर चंद्रकांत वारके, जितेंद्र पाटील, नंदकिशोर सोनवणे व धनराज पाटील यांनी त्याला तातडीने शेजारीच असलेल्या इंडो अमेरिकन रुग्णालयात दाखल केले. त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
पोलिसांची भेट
अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक नलनाथ तांबे, सहायक निरीक्षक रोही यांनी रुग्णालयात जखमीची भेट घेतली, परंतु तो बोलण्याच्या स्थितीत नसल्याने जबाब घेता आला नाही. तांबे व सहकार्‍यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. कार्यालयातील सहकार्‍यांनी वसंत याच्या जळगावातील बहिणीला फोन करून बोलावून घेतले.

यापूर्वीही घडली होती अशीच घटना
यापूर्वीही चार जानेवारी रोजी त्याला अशाच प्रकारचे फिट आले होते, तेव्हा तो भींतीवर कोसळला होता. त्यावेळीही त्याला सहकार्‍यांनी याच रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर या आजारावर त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. सेल्स मॅनेजर चंद्रकांत वारके यांनी औषधीसाठी त्याला दोन दिवसापूर्वी साडेपाचशे रुपये दिले होते.