त्या महिलेची प्रकृती स्थिर
By admin | Updated: March 16, 2016 08:34 IST
जळगाव- जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक विषप्राशन केलेल्या शिवाजीनगर परिसरातील भुरे मामलेदार प्लॉट भागातील सरला तुकाराम सोनवणे (४०) या महिलेची प्रकृती स्थिर आहे.
त्या महिलेची प्रकृती स्थिर
जळगाव- जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक विषप्राशन केलेल्या शिवाजीनगर परिसरातील भुरे मामलेदार प्लॉट भागातील सरला तुकाराम सोनवणे (४०) या महिलेची प्रकृती स्थिर आहे. या महिलेवर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्रकृती अजून धोक्याबाहेर येेण्यास काही तास वेळ लागेल, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पती, नातेवाईक उपस्थितसरला सोनवणे यांच्यासोबत त्यांचे पती तुकाराम सोनवणे व इतर नातेवाईक आहेत. मध्यरात्री नातेवाईक आले. ती बोलत असून, शुद्धीवर असल्याचेही सांगण्यात आले.