शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

निषेधाचे सूर तीव्र; आणखी सहा लेखकांचा एल्गार

By admin | Updated: October 15, 2015 23:36 IST

देशातील वाढती असहिष्णुता, वाढता तणाव आणि जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर साहित्यविश्वातून उमटत असलेले निषेधाचे सूरगुरुवारी अधिकच तीव्र झाले.

नवी दिल्ली : देशातील वाढती असहिष्णुता, वाढता तणाव आणि जातीय हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर साहित्यविश्वातून उमटत असलेले निषेधाचे सूरगुरुवारी अधिकच तीव्र झाले. राजस्थानातील प्रसिद्ध लेखक नंद भारद्वाज, इंग्रजीचे सुप्रसिद्ध कवी केकी एन. दारूवाला यांच्यासह आणखी सहा साहित्यिकांनी आपले अकादमी पुरस्कार परत केले. याचसोबत अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांची संख्या ३३ झाली. नंद भारद्वाज, केकी एन. दारूवाला यांच्यासह प्रसिद्ध कन्नड लेखक के.वीर. भद्रप्पा, के. नीला, आर. के. हुदुंगी तसेच काशीराम अम्वालजी यांनी आपले साहित्य अकादमी पुरस्कार परत करण्याचे जाहीर केले. या सर्व लेखकांनी अकादमीला पत्र लिहून देशातील वाढती असहिष्णुता आणि जातीय तणावावर चिंता व्यक्त केली. ज्ञानपीठ विजेत्यांचे समर्थनज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ हिंदी कवी कुंवर नारायण तसेच केदारनाथसिंह गुरुवारी अकादमी पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले. तसेच अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक काशीनाथ सिंह आणि अरुण कमल यांनी पुरस्कार परत करण्याऱ्या लेखकांना पाठिंबा दर्शवला. राष्ट्रपतींना साकडेकोलकाता : दादरी हत्याकांड आणि पुरोगामी विचारवंतांवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ एकजूट होत पश्चिम बंगालचे ९० लेखक व बुद्धिजीवींनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र लिहून त्यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी विनंती केली आहे. एम.एम. कलबुर्गी, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे या विचारवंतांच्या हत्या आणि दादरी हत्याकांडप्रकरणी सरकारची उदासीनता दहशत निर्माण करणारी आहे, असे या लेखकांनी पत्रात लिहिले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)नवी दिल्ली: पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांवर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी आपल्या ब्लॉगमधून सडकून टीका केली. इकलाखची हत्या ही दु:खद घटना आहे. पण लेखकांनी पुरस्कार परत करणे ही वैचारिक असहिष्णुता नाही का? डावे आणि नेहरूवादी विचारसरणीचे लोक मोदी सरकारसोबत जुळवून घेऊ शकलेले नाहीत. त्यातूनच भाजप व मोदी सरकारविरोधात ‘खोटा कागदोपत्री विरोध’ नोंदविण्याचे काम सुरू आहे. मोदी सरकारविरुद्ध सुरू असलेले हे दुसऱ्या प्रकारचे राजकारण आहे, असे जेटलींनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे.