शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, कष्टकऱ्यांचे नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे निधन

By विश्वास पाटील | Updated: January 13, 2025 18:43 IST

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तब्बल ११ महिन्याहून अधिक काळ त्यांनी कारावास भोगला

कोल्हापूर: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी, कामगार कष्टकऱ्यांचे नेते कॉ. कृष्णा मेणसे यांचे वयाच्या ९७ व्या वर्षी बेळगाव येथे निधन झाले. कॉम्रेड मेणसे हे गेली ७० वर्षाहून काळ श्रमिक, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष केला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांना तुरुंगवास झाला होता. तब्बल ११ महिन्याहून अधिक काळ त्यांनी कारावास भोगला होता.भाषावर प्रांत रचनेनंतर कर्नाटकात अडकलेल्या बिदर, भालकी, बेळगाव, कारवार या प्रदेशातील मराठी भाषिक जनतेच्या भाषिक स्वातंत्र्याच्या लढ्यात ते नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. सीमा लढा, कामगार कष्टकऱ्यांची आंदोलने करीत असताना पत्रकार म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. हेमंत या मासिका बरोबर साम्यवादी हे साप्ताहिक सुरु करून कष्टकऱ्यांच्या लढ्याला त्यांनी माध्यमात आणले. याबरोबर त्यांनी विपुल लेखन केले आहे. हो ची मिन्ह, बसवेश्वर ते ज्ञानेश्वर, गोटलेली धरती पेटलेली मने, असा लढलो असा घडलो, डॉ आंबेडकर आणि बुध्दधर्म, अशा तोडल्या बेड्या यासारख्या अनेक वैचारिक पुस्तकांचे लिखाणही त्यांनी केले आहे. सत्यशोधक विचारांचा त्यांच्या जडणघडणीवर मोठा प्रभाव राहिला. राष्ट्रवीरकार शामराव देसाई यांच्या सोबत बेळगाव परिसरात सत्यशोधक विचाराच्या प्रचार आणि प्रसारात ते पुढाकारात राहिले होते. विद्यार्थी आणि तरुण वयात कुस्तीपट्टू म्हणून त्यांचा बेळगाव परिसरात नावलौकिक होता. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावDeathमृत्यू