शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
2
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
3
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
4
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
5
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
6
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
7
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
8
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
9
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
10
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
11
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
12
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
13
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
14
पावसाची उसंत पण धरणाातून पाण्याचा विसर्ग; नद्या आल्या रस्त्यांवर, पुराचा विळखा अजूनही घट्ट
15
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
16
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
17
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
18
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
19
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
20
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा

कॉम्प्युटर सोसायटी नाशिक शाखेची कार्यकारिणी

By admin | Updated: June 2, 2014 08:55 IST

सातपूर : कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी गिरीश पगारे तर उपाध्यक्षपदी प्राचार्य प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली.

सातपूर : कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया नाशिक शाखेच्या अध्यक्षपदी गिरीश पगारे तर उपाध्यक्षपदी प्राचार्य प्रशांत पाटील यांची निवड करण्यात आली.
कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया नाशिक शाखेच्या नवीन कार्यकारिणीची निवड घोषित करण्यात आली. त्यात सेक्रेटरीपदी संदीप कारखानीस, खजिनदारपदी डॉ. उदय वाड यांची तर कार्यकारिणी सदस्य म्हणून मिलिंद रकिबे, अपूर्वा जाखडी, वैभव दाभाडे, नीलेश अलोने, राजेश शेठ, स्वीकृत सदस्य म्हणून चंद्रशेखर डहाळे, अविनाश शिरोडे, मंगेश पिसोळकर आदिंची निवड करण्यात आली आहे.
आगामी काळात कॉम्प्युटर व आय.टी. क्षेत्रातील सर्व संस्था, वर्किंग प्रोफेशनल्स यांच्याकरिता विशेष उपक्रम, तसेच संस्थेची स्वत:ची इमारत उभारणी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी काम करणार असल्याची माहिती प्राचार्य प्रशांत पाटील यांनी दिली.

ॲण्टी अल्को निकोच्या
उपाध्यक्षपदी अजित बागमार
नाशिक : महाराष्ट्रात व्यसनमुक्तीचे सर्वाधिक काम करणार्‍या ॲण्टी अल्को निको, महाराष्ट्र या व्यसनमुक्ती संस्थेच्या राज्य उपाध्यक्षपदी साई लाईफ मल्टीकेअरचे चेअरमन डॉ. अजित बागमार यांची नियुक्ती अध्यक्ष डॉ. रवींद्र डिसूझा यांनी केली आहे.
व्यसनांमुळे होणारी आरोग्याची व संसाराची हेळसांड रोखणे हे या संस्थेचे मूळ उद्दिष्ट आहे. याप्रसंगी डॉ. बिपीन पटेल, डॉ. शरद दुसाने, डॉ. पुरी, हेमराज खाबिया, गोपाळ पाटील, अजय ब्रšोचा, नंदलाल पारख, कमलेश कासव, सुभाष घिया, डॉ. प्रकाश हिरण, डॉ. संजय भावसार, डॉ. पेखळे, संजय पंचारिया, डॉ. गिरीधर पाटील, निंबराज अहिरे, बी. एम. कदम आदि उपस्थित होते.

राष्ट्रीय मुख्यालय आयुक्तपदी अशोक मोरे
नाशिक : नाशिक भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा संस्थेचे कोषाध्यक्ष अशोक मोरे यांची भारत स्काउट्स आणि गाईड्स पश्चिम विभागाच्या राष्ट्रीय मुख्यालय आयुक्तपदी पुढील तीन वर्षांसाठी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.
मोरे यांच्या या नियुक्तीमुळे नाशिक जिल्‘ात प्रथमच असा मोठा सन्मान मिळाला आहे. पश्चिम विभागाच्या राष्ट्रीय मुख्यालयांतर्गत महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगड या सहा राज्यांच्या कार्यक्षेत्राचा समावेश आहे.

जलसंस्कृती मंडळ
नाशिक : पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांचे सार्वजनिक क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. त्यांनी आपल्या जीवनात सर्व समाजातील लोकांच्या उद्धारासाठी व विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहेत. सर्वांनी त्यांचे कार्य व विचार डोळ्यासमोर ठेवून काम करावे, असे प्रतिपादन भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांनी केले.
भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या वतीने नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या अभिवादन समारंभात प्रा. रहाळकर बोलत होते. अहल्यादेवींनी दूरदृष्टी ठेवून सर्व धार्मिक स्थळाजवळ पाण्याची बारव बांधली. त्या बारवांमध्ये आजही मुबलक पाणी आहे.
प्रास्ताविक मंडळाचे सचिव दिलीप अहिरे यांनी केले. याप्रसंगी शिक्षक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र निकम, कार्यवाह शशांक मदाने, सरोजिनी तारापूरकर, सुभाष सूर्यवंशी, दत्ताराम नागपुरे, संतोष कुलकर्णी, तानाजी जाधव, एकनाथ कडाळे, दिनेश देवरे, शैलेश पाटोळे, बाळासाहेब पाटील, नरेंद्र मोहिते, हेमंत जानवे, प्रियंका निकम, एस्तेर गरुड, यशवंत चौधरी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनेश देवरे यांनी केले. शैलेश पाटोळे यांनी आभार मानले.
फोटो कॅप्शन : भारतीय जलसंस्कृती मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना प्रा. सूर्यकांत रहाळकर, राजेंद्र निकम, शशांक मदाने, सरोजिनी तारापूरकर, संतोष कुलकर्णी, दत्ता नागपुरे, सुभाष सूर्यवंशी, दिलीप अहिरे.