शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात बंदला संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: July 21, 2016 04:49 IST

चार दलित तरुणांना झालेल्या क्रूर मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी देण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला

अहमदाबाद : उना येथे ‘गायींचे संरक्षण’ करणाऱ्यांकडून चार दलित तरुणांना झालेल्या क्रूर मारहाणीच्या निषेधार्थ बुधवारी देण्यात आलेल्या बंदच्या आवाहनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. दलित पँथर सेना आणि इतर संघटनांनी दलितांवरील अत्याचारांच्या तसेच उना येथील मारहाणीच्या निषेधार्थ बंदची हाक दिली होती. या अत्याचारांच्या मुद्यावरून राज्यसभा आणि लोकसभेच्या कामकाजावर परिणाम झाला. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी गुरुवारी तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शुक्रवारी उना येथे भेट देणार आहेत. येथून ३६० किलोमीटरवरील आणि राजकोटजवळील उना येथे ११ जुलै रोजी चार दलित तरुणांना स्वत:ला गायींचे संरक्षक म्हणविणाऱ्यांनी गायीच्या कथित हत्येबद्दल जबर मारहाण केली होती. मृत गायींची कातडी काढण्याचे काम त्या तरुणांकडे देण्यात आले होते. मात्र त्यांनी गाय मारली, असा आरोप करून, मारहाण केली गेली होती. याप्रकरणी चार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.त्याच्या निषेधार्थ गुजरातच्या अमरेली शहरात काढण्यात आलेल्या मोर्च्याच्या वेळी दगडफेक झाली होती आणि चार दलितांनी विष प्राशन केले होते. विष प्राशन करणाऱ्यांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने प्रकरण अधिकच चिघळले. दगडफेकीत एक पोलीस कर्मचारीही मरण पावल्याचे सांगण्यात येते.बंद काळात काही ठिकाणी रस्ते अडविण्यात आले तर काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. बंदला बहुजन समाज पक्ष आणि जन संघर्ष मंचने तसेच पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी उदयपूर येथून पाठिंबा दिला होता.अहमदाबादेतील दैनंदिन व्यवहारांवर बंदचा परिणाम झाला नाही. मोजक्या भागातील दुकाने बंद होती. काही भागात निदर्शकांनी बंदची सक्ती करण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी उना येथील मोटा समालियला (मारहाणीची घटना येथे घडली) खेड्याला भेट देऊन मारहाण झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ज्या प्रकारे मारहाण झाली ती बघणारा कोणीही अस्वस्थ होईल, असे पटेल म्हणाल्या. राज्य सरकारने मारहाण झालेल्या चारही तरुणांना प्रत्येकी चार लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली. त्यांच्यावरील उपचारांचा खर्चही सरकारच करणार आहे. (वृत्तसंस्था)>दलितांना संरक्षण द्याकोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दलितांवर वाढत चाललेल्या अत्याचारांबद्दल बुधवारी चिंता व्यक्त करून केंद्र सरकारने दलितांची काळजी घ्यावी व त्यांना पूर्ण संरक्षण द्यावे, असे आवाहन केले. उनातील घटना ही दलितांविरुद्धचा संघटित गुन्हा आहे, असे त्यांनी टिष्ट्वटरद्वारे म्हटले.