शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

संपाला देशभर संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: September 3, 2016 06:44 IST

केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या केंद्रीय संघटनांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी संपाला

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या निषेधार्थ आणि विविध मागण्यांसाठी कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या केंद्रीय संघटनांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या देशव्यापी संपाला सर्व राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. काही राज्यांत रेल्वे, बसगाड्या अडवण्याचे प्रकार झाले, तर काही ठिकाणी रस्त्यांवर जाळपोळ करण्यात आली. संघटित, असंघटित कामगार, कर्मचारी आणि शेतमजूर तसेच अकुशल मजूर या संपात सहभागी झाले होते, असा दावा कामगार संघटनांनी केला. संपामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सरकारतर्फे सांगण्यात आले. या संपात बँका, टपाल कार्यालये तसेच विमा कार्यालये यात काम करणारे कर्मचारी सहभागी झाल्यामुळे आर्थिक व्यवहार थंडावले. संपामुळे १९ हजार कोटी रुपये किमतीच्या सुमारे २६ लाख चेक क्लीअर झाले नाहीत, अशी माहिती आॅल इंडिया बँक एम्प्लॉयीज असोसिएशनचे सरचिटणीस सी. वेंकटचलम यांनी दिली.

काही राज्यांनी स्वत:हून शाळा व महाविद्यालयांना सुटी जाहीर केली होती आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात या संपाचा थेट परिणाम लोकांना जाणवला नाही. ओडिशात या संपामुळे दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले. संपकऱ्यांनी रस्ते आणि रेल्वेमार्गांवर निदर्शने केली, तर कर्नाटकात संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. संपाचा फटका आसाममधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, बँकिंगसह इतर सेवांना बसला. राष्ट्रीकृत बँका, विमा कंपन्या, टपाल कार्यालये बंद होती. गुजरातमध्ये बँकिंग व्यवहारांवर संपाचा मोठा परिणाम झाला. सार्वजनिक क्षेत्रातील वेगवेगळ््या बँकांचे ३० हजार कर्मचारी संपात सहभागी होते. उत्तर प्रदेशात बँका बंद असल्या तरी परिवहन महामंडळाच्या बसगाड्या धावताना दिसल्या. संपाला पश्चिम बंगालमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. सिलिगुडीमध्ये २७० जणांना अटक करण्यात आली. सरकारी आणि इतर कार्यालयांचे कामकाज नित्याप्रमाणे सुरू होते. ममता बॅनर्जी सरकारने राज्यातील संप कठोरपणे मोडून काढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भाकपने केला. हिमाचल प्रदेश व आंध्र प्रदेशात संपाने दैनंदिन व्यवहारांवर परिणाम केला. शाळा,महाविद्यालये आणि इतर आवश्यक सेवा बंदच होत्या. विशाखापट्टणम येथे १०० जणांना ताब्यात घेण्यात आले. बिहारमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रिक्षा आणि बँका बंद होत्या.