शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गुंतागुंत आणखी वाढली

By admin | Updated: February 15, 2017 00:21 IST

मुख्यमंत्री होण्यासाठी बाशिंग बांधून बसलेल्या अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ता खटल्यात दोषी ठरवून

अजित गोगटे  मुख्यमंत्री होण्यासाठी बाशिंग बांधून बसलेल्या अण्णाद्रमुकच्या सरचिटणीस शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ता खटल्यात दोषी ठरवून सुप्रीम कोर्टाने त्यांची रवानगी चार वर्षांचा कारावास भोगण्यासाठी तुरुंगात केल्यानंतर तमिळनाडूमध्ये गेले १० दिवस सुरू असलेल्या सत्तासंघर्षातील गुंतागुंत अधिक वाढली आहे. हा गुंता सोडविण्यासाठी कार्यवाहक राज्यपाल विद्यासागर राव काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. मुख्यमंत्री कोणी व्हावे हे ठरविण्यासाठी विधानसभेत शक्तिप्रदर्शन करण्यास सांगणे हाच एकमेव लोकशाही मार्ग आहे, असा दंडक सर्वोच्च न्यायालयाने घालून दिला असल्याने राज्यपालांना तसे करण्यावाचून पर्याय नाही. परंतु शक्तिप्रदर्शनाच्या ठरावाचे नेमके स्वरूप काय असावे, हा कळीचा मुद्दा असून, त्याविषयी संदिग्धता आहे.सुप्रीम कोर्टाने बोहल्यावरून खाली उतरविल्यानंतही शशिकला यांनी नवे डावपेच लढविले. कार्यवाहक मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांच्यासह २० ‘बंडखोर’ नेत्यांची हकालपट्टी केली. मात्र पनीरसेल्वम यांच्याकडे गेलेल्या आमदार-खासदारांची हकालपट्टी न करता त्यांच्यासाठी माघारीचा दरवाजा खुला ठेवला. दुसरीकडे स्वत:च्या जागी, आपले विश्वासू पी. पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती केली. उत्तर प्रदेशात सन १९९७ मध्ये भाजपाचे कल्याण सिंग आणि उत्तर प्रदेश लोकतांत्रिक काँग्रेसचे जगदंबिका पाल यांनी केलेल्या बहुमताच्या प्रतिस्पर्धी दाव्यांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले होते. त्यावेळी राज्यपाल रोमेश भंडारी यांनी जगदंबिका पाल यांचा बहुमताचा दावा मान्य करून त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. कल्याण सिंग यांनी यास आव्हान दिल्यावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने राज्यपालांच्या या निर्णयास स्थगिती देऊन कल्याण सिंग यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसविले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून त्यात कल्याण सिंग व जगदंबिका पाल यांचे बहुमताचे प्रतिस्पर्धी दावे जोखण्यासाठी एकत्रित विश्वासदर्शक ठराव मांडण्याचा आदेश दिला होता. त्यात कल्याण सिंग यांनी बहुमत सिद्ध केल्याने त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहिले.तामिळनाडमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज्यपालांनी उत्तर प्रदेशप्रमाणे सत्तेच्या दोन्ही दावेदारांना विधानसभेत एकत्रित विश्वासदर्शक ठराव मांडून बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, असा सल्ला अ‍ॅटर्नी जनरल मुकुल रोहटगी यांनी राज्यपालांना दिला आहे. माजी केंद्रीय वित्तमंत्री व विधिज्ज्ञ पी. चिदम्बरम यांनीही असेच मत व्यक्त केले आहे.परंतु घटनाक्रमाचा विचार केल्यास सल्ला अप्रस्तुत वाटतो. येथे राज्यपालांकडे सरकारस्थापनेचे दोन प्रतिस्पर्धी दावे करण्यात आलेले नाहीत. पनीरसेल्वम यांनी दावा केलेला नाही. जयललिता यांच्या निधनानंतर ते मुख्यमंत्री झाले. शशिकला यांनी स्वत:ची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करून घेतल्यानंतर पनीरसेल्वम यांनीराजीनामा दिला. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत राज्यपालांनी त्यांना कार्यवाहक मुख्यमंत्रीपदी राहण्यास सांगितले. त्यानंतर पनीरसेल्वम यांनी शशिकलांविरुद्ध बंड पुकारले. त्यामुळे त्यांच्या कार्यवाहक मुख्यमंत्रीपदाचे स्वरूप बदलत नाही. राज्यपालांनी केलेली तात्पुरती व्यवस्था म्हणून ते मुख्यमंत्रु आहेत. पक्षात बंड केलेले असले तरी पनीरसेल्वम यांनी राज्यपालांकडे बहुमताच्या जोरावर सरकार स्थापनेचा दावा केलेला नाही.