शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मेहुणीविरोधात खंडणी आणि फसवणुकीची आपटेंची तक्रार

By admin | Updated: July 19, 2015 21:22 IST

ठाणे : अवघ्या सहा महिन्यांतच पत्नी अमृता किरकोळ भांडणामुळे माहेरी गेल्यानंतर तिच्यासह कापडिया कुटुंबच बेपत्ता असल्याची तक्रार सतीश आपटे यांनी नोंदविली होती. आता त्यांची मेहुणी मोनिका हिच्याविरुद्ध त्यांनी खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.

ठाणे : अवघ्या सहा महिन्यांतच पत्नी अमृता किरकोळ भांडणामुळे माहेरी गेल्यानंतर तिच्यासह कापडिया कुटुंबच बेपत्ता असल्याची तक्रार सतीश आपटे यांनी नोंदविली होती. आता त्यांची मेहुणी मोनिका हिच्याविरुद्ध त्यांनी खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा नौपाडा पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
अमृता यांच्या बेपत्ता होण्यामागे मोनिका कापडियावर आधी आपटेंनी संशय व्यक्त केला होता. त्यात अमृताचे दुसरे लग्न लावण्याचा कापडिया कुटुंबाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यांचे आधी मोनिकाशी लग्न होणार होते. नंतर ते रद्द झाले. आता तिची लहान बहीण अमृताशी त्यांचे लग्न झाल्यानंतर २००३ मध्ये त्यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या एका तक्रारीवरून तिने त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. तसेच अमृताला घटस्फोट दे, अन्यथा मला पैसे दे, अशी मागणी मोनिकाने त्यांच्याकडे केली आहे. दरम्यान, ५ ऑक्टोबर २०१४ रोजी लिसा अर्थात अमृता आणि सतीश यांचा साखरपुडा झाल्यानंतर ८ डिसेंबर २०१४ रोजी मोनिकाने आपटे यांच्या घरातून चार लाखांचे १५ तोळे सोने चोरले. हा प्रकार ९ डिसेंबरला उघड झाला. मात्र, जून २०१५ मध्ये हे दागिने परत करू, असे कापडिया कुटुंबीयांनी आपटेंना लेखी दिले. मधल्या काळात म्हणजे १ जानेवारी २०१५ रोजी या दाम्पत्याचे लग्न झाले. त्यात कापडिया यांचे संपूर्ण कुटुंबच आपटेंकडे वास्तव्य करू लागले. नंतर, सासूशी झालेल्या किरकोळ वादातून अमृता घरातून निघून गेली. आता आपटेंना दागिनेही मिळाले नाहीत. शिवाय, पैशांसाठी धमकी, या सर्व प्रकारावरून त्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात १७ जुलै रोजी मोनिकाविरुद्ध खंडणी, धमकी देणे आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन सुरवसे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
.......................
प्रतितिधी - जितेंद्र कालेकर
.......................................
वाचली - नारायण जाधव