शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जवानाची तक्रार तथ्यहीन

By admin | Updated: January 15, 2017 00:08 IST

नियंत्रण रेषेवरील जवानांना निकृष्ट अन्न मिळत असल्याच्या बीएसएफ जवान तेजबहादूर यादवच्या तक्रारीत तथ्य नाही, असे गृहमंत्रालयाने पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयाला

नवी दिल्ली : नियंत्रण रेषेवरील जवानांना निकृष्ट अन्न मिळत असल्याच्या बीएसएफ जवान तेजबहादूर यादवच्या तक्रारीत तथ्य नाही, असे गृहमंत्रालयाने पीएमओ अर्थात पंतप्रधान कार्यालयाला सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. तेजबहादूरने सोशल मीडियावर ‘व्हिडिओ व्हायरल’ करून जवानांना निकृष्ट दर्जाचे अन्न मिळत असल्याची तक्रार केली होती. या व्हिडिओमुळे देशभर खळबळ उडाल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्रालयाने या प्रकरणी चौकशी करून पीएमओला अहवाल सादर केला. नियंत्रण रेषेवर तैनात जवानांना निकृष्ट अन्न दिले जात असल्याच्या तक्रारीत तथ्य आढळून आले नाही. त्यामुळे या तक्रारीला सत्य मानू नये, असे या अहवालात म्हटले आहे. निकृष्ट अन्नाबाबतच्या तेजबहादूरचा व्हिडिओ सोशल मीडियावर ३० लाख वेळा पाहण्यात आला आहे. या व्हिडिओनंतर पंतप्रधान कार्यालयाने याबाबत गृहमंत्रालयाकडून अहवाल मागितला होता. गृहमंत्री राजनाथसिंह यांनी याबाबत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. पीएमओला सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे की, कोणत्याही चौैकीवर तैनात जवानांसाठी रेशनचा तुटवडा नाही. त्याचबरोबर जेवणाच्या दर्जाची नियमित तपासणी करण्यात येते. गृहमंत्रालयाने निमलष्करी दलांना सर्व जवानांच्या तक्रारी गांभीर्याने घेण्याचे तसेच जवानांना दिल्या जाणाऱ्या अन्नाचा दर्जा आणखी सुधारण्याचे आदेश दिले आहेत, असे पीएमओला सांगण्यात आले. नवी मार्गदर्शक तत्वे जारी- अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोपही तेजबहादूरने केला होता.- चौकीवर अन्नधान्याची ददात असू नये याची बीएसएफ खबरदारी घेते. तैनात जवानांनी कधीही अशी तक्रार केलेली नाही. बीएसएफने आपल्या जवानांना चांगले अन्न मिळावे यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.