शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘उडता पंजाब’ फूट प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार

By admin | Updated: June 17, 2016 02:36 IST

सैराट पाठोपाठ उडता पंजाब या चित्रपटाची सेन्सॉर कॉपी फुटल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रोडक्शन हाऊसतर्फे दाखल झालेल्या तक्रारीवरुन सायबर सेलने तपास सुरु केला आहे. सायबर सेलने

मुंबई : सैराट पाठोपाठ उडता पंजाब या चित्रपटाची सेन्सॉर कॉपी फुटल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी प्रोडक्शन हाऊसतर्फे दाखल झालेल्या तक्रारीवरुन सायबर सेलने तपास सुरु केला आहे. सायबर सेलने याप्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु केली आहे. अनुराग कश्यपची सहनिर्मिती असलेला ’उडता पंजाब’हा चित्रपट पंजाबमधील तरुणाईला बसलेल्या ड्रग्सच्या विळख्यावर भाष्य करणारा चित्रपट आहे. चित्रपटातील काही दृश्यांवरून निर्माण झालेल्या वादातून मुक्तता मिळून दोन दिवसही झाले नसताना बुधवारी उडता पंजाब या चित्रपटाला धक्का बसला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची सेन्सॉर कॉपी फुटल्याने खळबळ उडाली. बुधवारी रात्री या चित्रपटाची सेन्सॉर कॉपी आॅनलाईन लीक झाली. यातील एक क्लिप ४० मिनिटांची, तर दुसरी दोन तास २० मिनिटांची आहे. याप्रकरणी पेंटॉम हाऊस प्रॉडक्शन तर्फे सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार आयटी अ‍ॅक्टनुसार टेक्निकल एक्स्पर्ट आणि रिसर्च विंगने याचा तपास सुरु केला आहे. प्राथमिक तपासात पाचशेहून अधिक साईटवर उडता पंजाबचे प्रसारण झाले. त्यापैकी दिडशे साईट्स ब्लॉक करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी दिली. (प्रतिनिधी)वेबसाईट्सही गुन्हेगार...डाटा चोरी आणि कॉपीराईटचे उल्लंघन केल्यामुळे उडता पंजाब लीक प्रकरण हे सायबर क्राईममध्ये मोडते. ही बाब वेबसाईटच्या लक्षात आणून देऊनही त्यांनी ते हटविण्यास नकार दिला. त्यामुळे तेही गुन्ह्याला प्रोत्साहन देण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे.- अ‍ॅड. प्रशांत माळी, सायबर लॉ आणि आय.पी.आर तज्ज्ञ