तक्रारकर्ताच फितूर : टोल नाका लूट प्रकरण
By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST
फिर्यादीच फितूर : टोल नाका
तक्रारकर्ताच फितूर : टोल नाका लूट प्रकरण
फिर्यादीच फितूर : टोल नाकालुटीतील आरोपी निर्दोषआरोपींमध्ये माजी नगरसेवकनागपूर : वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टोल नाका लूट प्रकरणी खुद्द फिर्यादीच फितूर झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश वसंत कुळकर्णी यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देत सर्व चारही आरोपींची निर्दोष सुटका केली. माजी नगरसेवक राजू माटे रा. सुरेंद्रनगर, अनिल ऊर्फ अण्णा राऊत रा. बिडीपेठ, राजू जंगले रा. वाडी आणि आशिष झा रा. अजनी, अशी आरोपींची नावे आहेत. सरकार पक्षानुसार या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी, ११ जानेवारी २०१३ रोजी अण्णा राऊत आणि राजू माटे यांनी वाडी आणि दाभा भागातील टोल नाक्यांवर खंडणी वसुलीसाठी पाठविले होते. टोल नाका संचालकाने खंडणी देण्यास नकार देताच आरोपींनी लुटलूट केली होती. एकूण ८५ हजाराची रक्कम त्यांनी लुटली होती. फिर्यादी राजेंद्र सुभाष देशमुख यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी भादंविच्या ३९२, ३९७, ३४, १०९ कलमान्वये गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक केली होती. उपनिरीक्षक दहातोंडे यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले होते. खुद्द फिर्यादी आणि अन्य तीन साक्षीदार फितूर झाले होते. त्यामुळे सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली. न्यायालयात आरोपींच्या वतीने ॲड. राम मासुरके, ॲड. पराग उके तर सरकारच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील वसंत नरसापूरकर यांनी काम पाहिले.