स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासानेच यश मिळते : प्राचार्य हुजरे
By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST
इचलकरंजी : नेट-सेटसारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये आत्मविश्वासानेच विद्यार्थ्यांना यश मिळते. म्हणून अभ्यासातील सातत्य आणि चिकाटी ठेवून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले.
स्पर्धा परीक्षांना आत्मविश्वासानेच यश मिळते : प्राचार्य हुजरे
इचलकरंजी : नेट-सेटसारख्या स्पर्धा परीक्षेमध्ये आत्मविश्वासानेच विद्यार्थ्यांना यश मिळते. म्हणून अभ्यासातील सातत्य आणि चिकाटी ठेवून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांनी केले.येथील दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालयामध्ये नेट-सेट कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेमध्ये प्रा. व्ही. एस. वांद्रे, जोतिराम मळेगावकर, गंगाधर चक्रे, प्रा. सुधाकर इंडी व प्रदीप पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुरुवातीला प्रा. संजय अंकुशराव यांनी प्रास्ताविक व प्रा. उमाकांत हत्तीकट यांनी सूत्रसंचालन व प्रा. दीपक तुपे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)