शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रेल्वेला उशीर झाल्यास प्रवाशांना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 05:13 IST

सप्टेंबरअखेर सेवा : पहिली रेल्वे लखनौ-दिल्ली एक्स्प्रेस; प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी

नवी दिल्ली : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (आयआरसीटीसी) चालवल्या जाणाऱ्या लखनौ-दिल्ली तेजस एक्स्प्रेस या देशातील पहिल्या ‘खासगी रेल्वेला’ (प्रायव्हेट ट्रेन) तासभर उशीर झाला तर प्रवाशांना नुकसानभरपाई मिळेल. भारतीय रेल्वे आता आपल्या सेवेचा चेहरा बदलण्याच्या प्रयत्नात असून, दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस आणि मुंबई-अहमदाबाद तेजस एक्स्प्रेस या रेल्वेंना खासगी स्वरूपात चालवले जाणार असून, त्यांच्यात प्रवाशांसाठी जागतिक दर्जाच्या सुखसोयी व आरामदायी व्यवस्था असतील.

दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस येत्या सप्टेंबरअखेर सेवेत रुजू होण्याच्या तयारीत असून, ही रेल्वे जर तासभर उशिरा आली तर प्रवाशांना त्याची काही भरपाई (पेआऊट्स) देण्याचा विचार आयआरसीटीसी करीत आहे, असे वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.‘आम्ही दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेस चालवण्याच्या योजनांना अंतिम रूप देत असून त्यात ही रेल्वे विलंबाने आली तर प्रवाशांना काही भरपाई देण्याचा एक विचार आहे. ही भरपाई प्रवाशांच्या ई-वॉलेट्सवर काही के्रडिट किंवा भविष्यातील प्रवासात सवलत अशा स्वरूपाची असेल.

याशिवाय दिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसमध्ये जास्तीचे जेवण देण्याचाही विचार आहे. अजून काहीही अंतिम केलेले नसले तरी रेल्वे दिल्ली व लखनौत पोहोचेल तेव्हा दुसºया जेवणाची वेळ झालेली असेल. त्यामुळे टर्मिनल स्टेशनवर रेल्वे येते तेव्हा आम्ही स्नॅकसारखे जेवण वितरित करण्याच्या विचारात आहोत, असे तो म्हणाला.या असतील सुविधादिल्ली-लखनौ तेजस एक्स्प्रेसमध्ये चहा/कॉफीच्या व्हेंडिंग मशीन्स असतील आणि प्रवाशांनी मागणी केल्यास पाण्याव्यतिरिक्त (बेव्हरिजेस) पेयही त्यांना घेता येईल.नव्या तेजस एक्स्प्रेस रेल्वेत विमानात असतात तशा टॉयलेटची सेवा देण्याचा विचार आहे. याचा अर्थ प्रत्येक डब्यात फक्त दोनच टॉयलेटस् प्रवाशांच्या वापरासाठी असतील.हा प्रवास दिवसाचा असून विमानात १५० प्रवाशांसाठी फक्त तीन टॉयलेटस् असतात तर तेजस एक्स्प्रेसमध्ये ७२ प्रवाशांसाठी दोन टॉयलेटस् असतील.