शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सरकार मागणार भरपाई

By admin | Updated: August 12, 2015 02:06 IST

‘मॅगी टू मिनिट नूडल्स’ हे उत्पादन त्यातील शिशे व अजिनोमोटोच्या जास्त प्रमाणामुळे सेवनास हानीकारक असूनही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व अनुचित व्यापार प्रथांचा अवलंब

नवी दिल्ली : ‘मॅगी टू मिनिट नूडल्स’ हे उत्पादन त्यातील शिशे व अजिनोमोटोच्या जास्त प्रमाणामुळे सेवनास हानीकारक असूनही दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व अनुचित व्यापार प्रथांचा अवलंब करीत हे उत्पादन बाजारात विकून ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल भारत सरकार या नूडल्सचे उत्पादन करणाऱ्या नेस्ले इंडिया कंपनीविरुद्ध भरपाईचा दावा दाखल करण्याच्या तयारीत आहे.नेस्ले इंडिया ही नेस्ले या बलाढ्य स्वीस बहुराष्ट्रीय कंपनीची भारतीय उपकंपनी आहे. भारतीय अन्न प्रमाणक प्राधिकरणाने बंदी घातल्याने गेले दोन महिने मॅगी नूडल्सची देशभरात विक्री बंद असून कंपनीने बाजारात शिल्लक असलेला मालही परत मागवून नष्ट केला आहे. या बंदीविरुद्ध कंपनीने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, मॅगी नूडल्ससंबंधीची फाईल मंत्र्यांनी हातावेगळी केली असून त्यानुसार हे मंत्रालय नेस्ले इंडिया कंपनीविरुद्ध ४२६ कोटी रुपयांच्या भरपाईसाठी लवकरच राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे फिर्याद दाखल करेल. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती व अनुचित व्यापार प्रथेमुळे भारतीय ग्राहकांचे कंपनीने जे नुकसान केले त्याबद्दल ही भरपाई मागितली जाणार आहे. मॅगी नूडल्सचा वाद जून महिन्यात सर्वप्रथम सुरू झाला तेव्हा केंद्रीय ग्राहक व्यवहारमंत्री रामविलास पासवान यांनी हा गंभीर विषय असल्याचे नमूद करून याविरुद्ध राष्ट्रीय ग्राहक आयोगाकडे दाद मागितली जाईल, असे सुतोवाच केले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)३० वर्षांत असा पहिला दावाउत्पादक आणि सेवा पुरवठादारांकडून होणाऱ्या पिळवणुकीविरुद्ध ग्राहकांना दाद मागता यावी आणि त्यांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी सुमारे ३० वर्षांपूर्वी ग्राहक संरक्षण कायदा केला गेला. त्यानुसार ग्राहकांच्या फिर्यादींची सुनावणी करून निवाडा करण्यासाठी जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत ग्राहक न्यायालये स्थापन केली गेली.या न्यायालयांमध्ये आजवर ग्राहकच दाद मागत आले व फक्त ग्राहकच फिर्याद करू शकतात, असा सर्वसाधारण समजही आहे; परंतु तसे नाही. संपूर्ण ग्राहकवर्गाला ज्याची झळ पोहोचली असेल अशा विषयात ग्राहकांच्या वतीने केंद्र किंवा राज्य सरकारने ग्राहक न्यायालयात प्रातिनिधिक स्वरूपाची फिर्याद करण्याची अनोखी तरतूद या कायद्याच्या कलम १२-१-डी मध्ये आहे. त्याचाच आधार घेऊन केंद्र सरकार नेस्ले कंपनीविरुद्ध हा दावा दाखल करणार आहे. कायदा लागू झाल्यापासून गेल्या ३० वर्षांत सरकारने केलेला असा हा पहिलाच दावा असेल.