शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची संघटनात्मक बांधणी संघाच्या तुलनेत कमकुवत- पी. चिदंबरम

By admin | Updated: March 19, 2017 16:51 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 19 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाची संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. मात्र त्या तुलनेत काँग्रेसचे संघटन कमकुवत असल्याचं मत काँग्रेसचे नेते, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मांडलं आहे. कोलकात्यात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही निवडणुकीच्या दिवशी मत स्वतःकडे खेचून आणण्याची क्षमता संघटनेत असावी लागते. त्यासाठी संघटनेची बांधणीही महत्त्वाची असते. मात्र काँग्रेसची संघटनात्मक बांधणी कमजोर असल्याचं म्हणत पी. चिदंबरम यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे. पण भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं पश्चिम बंगालमधल्या तृणमूल काँग्रेस आणि तामिळनाडूतल्या अण्णा द्रमुक पक्षाच्या विरोधात जनाधार खेचण्याचा प्रयत्न केल्यास निश्चितच त्यांचा पदरी अपयश पडेल, असंही पी. चिदंबरम यांनी सूतोवाच केले आहेत. काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाला 29 राज्यांत 29 प्रकारची वेगवेगळी धोरणं राबवावी लागतील. समजा गुजरातचे धोरण आसाममध्ये राबवल्यास ते चालेलच असे नाही, ही कल्पना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना दिल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. नोटाबंदीचा विचार करता राजकीय लढाईत भाजपा वरचढ ठरत काँग्रेसचा पराभव झाला असला तरी आर्थिक मुद्द्यांवरील काँग्रेसचे विश्लेषण खरे ठरले आहे. देशाचा जीडीपी 7.83 टक्क्यांवरून 6.61 टक्क्यांपर्यंत घसरला आहे. तसेच जनता सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी धजावत नाही. कारण जर आपण सरकारच्या विरोधात बोललो तर आपल्यालाही त्रास होईल हा विचार करून जनता तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत असल्याची टीकाही पी. चिदंबरम यांनी केली आहे. एकंदरीतच चिदंबरम यांनी स्वपक्षीयांसोबत काँग्रेसलाही चिमटे काढले आहेत.